CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सहार पोलीस स्टेशन, मुंबई कडील फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहीजे आरोपी गुन्हे शाखा कक्ष- २ पनवेल, नवी मुंबई कडुन जेरबंद.

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

crime border news network : लाखोची फसवणूक करणाऱ्या पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा पनवेल कक्ष २ कडून अटक-सहार पोलीस स्टेशन, मुंबई कडील फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहीजे आरोपी गुन्हे शाखा कक्ष- २ पनवेल, नवी मुंबई कडुन जेरबंद.

डोंबिवली : अंधेरी मुंबई येथील ऑनसाईट इलेक्ट्रो सर्व्हिसेस प्रा.लि. या इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या सेवा पुरवणा-या कंपनिमधील सर्वीस को ऑर्डिनेटर नागेश भिकाजी राणे, वय-३६, धंदा- नोकरी, रा. रुम नं. ०६, बी विंग, तानिया हाईट्स, वसई (पु) याने त्याचा साथिदार अभिषेक कुमार सिंग याचे सोबत कंपनीच्या अकाउंटचा अपहार करुन फसवणुक केल्याने सहार पोलीस ठाणे, मुंबई गु.रजि.क्र. 250/2022 भा.दं.वि. कलम 408,409,34 प्रमाणे दि.२२ एप्रिल २०२२ रोजी दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे नागेश भिकाजी राणे, वय-36, धंदा- नोकरी, रा. रुम नं. ०६, बी विंग, तानिया हाईट्स, वसई (पु) हा गेली अनेक दिवस मिळुन येत नव्हता. नमूद आरोपी हा दिवसभरात काही मिनिटेच मोबाईल वापरत असे. आरोपीचे लोकेशन नवी मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने मुंबई पोलिसांनी नमुद आरोपीचा शोध घेण्याबाबत कळविले होते.

सदरच्या गंभीर गुन्ह्यातील पाहीजे आरोपीस अटक करणेबाबत मा. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सह. पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी आदेशीत केले होते.

सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याच्या अनुशंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वत्स यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, गुन्हे शाखा कक्ष -२ पनवेल नवी मुंबई यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ पनवेल चे पथकाने नमुद आरोपीची माहिती काढत असताना नमुद आरोपी हा तळोजा, दिपक फर्टिलायझर कंपनी परिसरामध्ये असलेबाबत माहीती मिळाली होती. त्या अनुशंगाने तांत्रिक तपास करुन व गोपनिय माहीती मिळवुन नमुद आरोपीस सापळा लावुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन पुढिल तपासकामी त्यास सहार पोलीस ठाणे, मुंबई यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष-२ ,पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. संदिप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, पो.हवा. अनिल पाटील, मधुकर गडगे प्रशांत काटकर, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, सचिन पवार, जगदिश तांडेल, राजेश बैकर, पो.ना. दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रुपेश पाटील, निलेश पाटील, सचिन म्हात्रे, राहुल पवार, अजिनाथ फुंदे, प्रफुल्ल मोरे, नंदकुमार ढगे, अभिजित मे-या, पो.शि. संजय पाटील, प्रविण भोपी, विक्रांत माळी यांनी केली आहे.