CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
भिवंडी तालुक्यातील (Bhivandi Murder) गोदाम पट्टा समजल्या जाणाऱ्या वळपाडा हद्दीतील, पारसनाथ कंपाऊंड येथे एका गटारात (the body thrown into the sewer) ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या (the body was wrapped in a blanket) अवस्थेत एका ३०/३२ वर्षे वयाच्या तरुण महिलेचा मृतदेह नारपोली पोलीसांना मिळाला आहे.
पोलीसांनी, अज्ञात आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून, तपास सुरु केला आहे . सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात (Late Indira Gandhi Upazila Hospital) पाठविला आहे.अनोळख्या महिलेचा मृतदेह (woman was killed) ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत गटारात (the body thrown into the sewer) आढळून आल्याने, परिसरात खळबळ उडाली आहे.
भिवंडी तालुक्यातील वळपाडा हद्दीतील, पारसनाथ कंपाऊंड मधील एका मोठ्या गटारात ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात, हत्येसह पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करून, पोलीस तपासकरीत आहे.
भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा समजल्या जाणाऱ्या वळपाडा हद्दीतील, पारसनाथ कंपाऊंड मधील दोन इमारतीच्या गोदामामध्ये मोठे गटार आहे. या गटारीच्या बाजूला काल (26 जुलै) रात्रीच्या सुमारास गावातील एका प्लंबरला महिलेचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याने या घटनेची माहिती वळपाडा हद्दीतील सुनंदा पाटील (वय ४८) यांना दिली. माहिती मिळताच, पोलीस पाटील यांनी नारपोली पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. तर (27 जुलै) पहाटेच्या सुमारास पोलीस पाटील, यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात, अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) राजेश वाघमारे करीत आहेत.