CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
अंबरनाथ : क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) सामाजिक संस्था आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत असताना अंबरनाथ येथे मागच्या वर्षी सुरु झालेले वृद्धांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता वृद्धांची काळजी घेणारे श्री ॐ सिद्धिविनायक फाउंडेशनचे वृद्धाश्रम कार्यरत असल्याचे समजले.
या ठिकाणी अंबरनाथ शिवाजी पोलीस स्टेशन चे स. पो.निरी. जयेंद्र भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. शि. दादासाहेब वाघमारे व पो. ना. कैलास पारधी, निलेश सांगळे यांच्या मदतीने अंबरनाथ परिसरातील वृद्धाश्रम , अनाथालय यांना राजेंद्र वखरे यांनी भेट दिली असता श्री ॐ सिद्धिविनायक वृद्धाश्रमास साहित्याची व मदतीची गरज असल्याचे ओळखून (सी.आर.डब्ल्यू.ए) एनजीओ तर्फे वृद्ध आजी आजोबांना जेवणासाठी लागणारे ताट (भांडी) स.पो.नि. जयेंद्र भोयर यांच्या हस्ते वृद्धाश्रमाच्या संचालिका विजयालक्ष्मी बसनगार,बनश्री बिश्वास,देवकी चलवादी (आजी),. लक्ष्मी (आजी) व वृद्धाश्रमातील आजी यांना सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी . तुळशीराम सावंत,पो.शि. दादासाहेब वाघमारे,पो.ना.कैलास पारधी, पो. ना.निलेश सांगळे ,यांच्यासह फणसीपाडा येथील समाजसेवक विलास खरे वएनजीओ तर्फे सौ.सीमा वखरे, नितीन सैद , सौ.चित्रा कामत, सोनाली झोडगे,रमेश काठे ,मुकेश म्हात्रे, फकीरबा नेव्हार, संतोष कोलंबकर आदि उपस्थित होते.