CRIME BORDER | 26 December 2025 | 02:43 PM
भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश कोळी /नाशिक विभागीय संपादक : डॉ. शशिकांत काळे
भुसावळ : शहरातील २५ लाख ४२ हजार रुपये लुटीचा भुसावळ तालुका पोलीसांनी अवघ्या ४८ तासात तपास करत सहा जणांना अटक केली . त्यापैकी तिघे भुसावळ व तीन जण रसलपुर तालुका रावेर येथील आहेत. विशेष म्हणजे या लुटीचा मुख्य सूत्रधार हा फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीतील चालक निघाला त्याने लुटीची टीप दिली होती.
पोलीसांनी २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले . अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली .
दि. २८ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री १० वाजता फिर्यादी तथा रॉयल कंपनीतील रोपाल मोहम्मद यासीन इस्माईल हे आपल्या कंपनीतील २५ लाख ४२ हजार रुपये पिशवीत घेऊन दुचाकीने साईनगर कडे घरी जात होते खडका शिवारातील कच्च्या रस्त्यावर तिघांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला . त्यामुळे ते खाली पडले त्यानंतर तिघांनी पैशाची बॅग घेऊन अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. त्यात फिर्यादीच्या कंपनीतील चालक शाहिद याच्यावर संशय बळावला . चौकशीत त्याने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली . कंपनीत वाहन चालक असल्याने त्याला पैशाची ने आण करण्याची पूर्णवेळ माहित होती. त्यानेच कंपनीतील रोखपाल यासीन शेख यांच्याजवळ पैसे असल्याची टीप साथीदार मुजाहिद मलिक, मोहम्मद दानिश राहणार भुसावळ यांना दिली. या दोघांनी नंतर रसलपुर तालुका रावेर येथील अजहर मलिक , आमिर खान आणि इजहार बेग या तिघांना बोलावून लुटीचा कट आखला.
त्यानुसार दि. २८ /१०/२०२५ च्या रात्री रसलपूरच्या तिघांनी लूट केली संशयीतापैकी शाहिद बेग याच्यावर मलकापूर तालुका शहर, ग्रामीण आणि बोराखेडी पोलीस ठाण्यात केबल चोरी तर आमिर खानवर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा आहे . ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली