CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
Dr. Babasaheb Ambedkar Jyanti विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने ९ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन-'भगवामय' वातावरणात पार पडणार डॉ . बाबासाहेब आंबडकर स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा !
मंगळवार दि . १२ एप्रिल रोजी स्मारका बाबतच्या शासकीय स्तरावरील सर्व परवानग्या प्राप्त झाल्यास नियोजित डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा भूमिपूजन सोहळा शासकीय स्तरावर होण्याची शक्यता असून यात काही तांत्रीक अडचण निर्माण झालीच तर हा भूमिपूजन सोहळा 'स्मारक समितीच्या ' माध्यमातुन पार पडण्याचीही शक्यता आहे . असे असले तरीही या स्मारकाचा प्रश्न कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी अंतिमतः मार्गी लावला असल्याने या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेची कीनार असल्याने या दिवशी प्रभाग ड कार्यालय परिसर हा 'भगवामय ' होण्याची शक्यता आहे .
कल्याण /डोंबिवली: कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष खंडीत झालेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला या वर्षी शासन स्तरावरुन परवानगी मिळत आहे, याच बरोबर गेली ८ वर्ष रखडलेला कल्याण पूर्वेतील प्रभाग ड कार्यालया समोरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्थापण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे . या दोन दुग्धशर्करा योगाचा सुवर्ण मध्य साधून या वर्षी कल्याण पूर्वेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग ६ दिवसांच्या भिमोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने आंबेडकर प्रेमी जनतेत उत्साह संचारला आहे .
जयंती उत्सव समितीचे या वर्षीचे अध्यक्ष केतन रोकडे यांनी आपल्या अधिपत्त्या खाली तब्बल ८० हून अधिक कार्याध्यक्ष असलेल्या रेकॉर्ड ब्रेक कार्यकारणीची समितीची स्थापना केली असून या समितीच्या माध्यमातून ९ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान या महा भिमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
सिद्धार्थ नगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडापटांगणात शनिवार दि ९ एप्रिल रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या भिमोत्सवाला प्रारंभ होणार असुन याच दिवशी सतिष सोनवणे प्रस्तुत ' भिमसुर्य समतेचा ' या बुद्ध भिम गितांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
याच ठिकाणी रविवार दि १० एप्रिल रोजी लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजिव संदेश उमप यांच्या ' माझ्या भिमरायाचा मळा ' या कार्यक्रमातून बुद्ध भिम गिते सादर होणार आहेत, सोमवार दि . ११ एप्रिल रोजी सुप्रसिध्द महिला शाहीर सीमा पाटील तसेच जॉली मोरे हे ' एक निळा, एक भगवा ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार आहेत .मंगळवार दि . १२ एप्रिल रोजी प्रभाग ड कार्यालयासमोर संगत थिएटर प्रस्तुत ' भिमा तुम्हा वंदतो ' हा संगित, गित आणि नृत्य प्रधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
बुधवार दि . १३ एप्रिल रोजी प्रभाग ड कार्यालयासमोरील नियोजित स्मारकाच्या जागेवर रात्री १० ते १२ या कालावधीत विश्वरतत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी धम्म वंदनेसह विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
गुरुवार दि . १४ एप्रिल रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भव्य समता फेरी निघणार आहे . या समता फेरीचा प्रारंभ डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक पत्री पुल येथून सायं ४ वाजता होणार असून या समता फेरीचा समारोप प्रभाग ड कार्यालया समोर होणार आहे .दोन वर्षाच्या कालखंडानंतर आणि कल्याण पूर्वेतील तमाम आंबेडकर वादी जनतेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीची स्वप्न पूर्ती पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या भिमोत्सवात तमाम आंबेडकर प्रेमी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे .