CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उत्साह गणेशोत्सवाचा निश्चय पर्यावरणचा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कल्याण : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविदयालयाचे विदयार्थी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गेली अनेक वर्षे इकोफ्रेंडली गण्पती तयार करुन पर्यावरण हिताचा संदेश देतात. कोरोनाच्या काळात दोन वर्ष या प्रकल्पाला खंड पडलेला. परंतु पुन्हा एकदा यावर्षी विदयार्थ्यांनी उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी टेराकोटा माती पासून गणेशमूर्ती साकार करुन आपला आनंद व दोन वर्षांची उणीव भरुन काढली व अगदी उत्साहात, जोशात गणेशमूर्ती साकारल्या.

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविदयालय इयत्ता 13 वी, इयत्ता 14 वी इयत्ता 15 च्या विदयार्थ्यांना रिध्दी आर्ट स्टुडिओच्या रिध्दी शेळके यांनी गणेशमूर्ती कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले व विदयार्थ्यांकडून टेराकोटा या मातीच्या सुंदर सुबक व अशा गणेशमूर्ती साकारुन घेतल्या. टेराकोटा ही माती पुरातनकाळापासून वापरली जाते या मातीचा वापर भरपूर कामांसाठी केला जातो. ही माती सहज विरघळते. निसर्गाच्या दृष्टीने ही माती अजिबात हानीकारक नाही. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणुन पर्यावरणाचा संदेश या मार्फत देण्यासाठी हा उपक्रम पुन्हा सुरु करुन सगळयांनी बाप्पाला प्रार्थना केली, ही कोरोना व इतर संकटापासुन संरक्षण करण्यासाठी ताकद आम्हाला दे.संस्थेच्या सदस्या व प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते प्राध्यापकवर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीयांनी देखिल पर्यावरणास उपयुक्त अशा उपक्रमात सहभाग घेतला.