CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनांचा लाभ घ्यावा-मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती संजय निमसे, आणि – मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांचे आवाहन

ठाणे दि. ५ नोव्हेंबर : आदिवासी शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) सन २०२०-२१ मध्ये ठाणे जिल्हयात राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली असून इच्छुक शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. असे आवाहन कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती श्री.संजय निमसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.

अर्ज नोंदणीसाठी जातीचे प्रमाणपत्र, ७/१२ , ८अ उतारा , आधारकार्ड , बँक खाते क्रमांक, तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला तसेच ग्रामसभेचा ठराव इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रासह आपला प्रस्ताव आपणाशी संबधीत पंचायत समिती कार्यालयामधील कृषि अधिकारी यांचेकडे वेळेत स्वहस्ते सादर करावा व अर्जाची पोहोच घ्यावी.

अ.क्र.

बाब

उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये )

१ नवीन विहीर २,५०,०००/-

२ जुनी विहीर दुरुस्ती ५०,०००/-

३ ईनवेल बोअरिंग २०,०००/-

४ वीज जोडणी आकार १०,०००/-

५ शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण १,००,०००/-

६ सूक्ष्म सिंचन संच अ) ठिबक संच ५०,०००/-

ब) तुषार संच २५,०००/-

७ परसबाग ५००/-

८ पंपसंच (डिझेल/विदयुत) २००००/- (१० अश्वशक्ती पर्यंत)

९ पीव्हीसी /एचडीपीई पाईप ३००००/-

या योजनांतर्गत वरील बाबींचा समावेश असला तरी या योजनेचा लाभ पॅकेज स्वरुपात देय आहे असे एकूण तीन पॅकेज असून पैकी एका पॅकेजचा लाभ देय राहील.

 नवीन विहीर पॅकेज – सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना नवीन विहीर वीज जोडणी आकार सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी /एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून लाभार्थ्याने नवीन विहीर या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.

 जुनी विहीर दुरुस्ती – सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थींन विहीर घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

 शेततळयाचे अस्तरीकरण - सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी /एचडीपीई पाईप, परसबाग, या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून अशा लाभार्थीने नवीन विहीर , जुनी वहीर दुरुस्ती अशा घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

 ज्या शेतक-यांनी यापूर्वीच शासकिय योजनेतून विहीर घेतली असेल अथवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतक-यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचना संच (ठिबक/तुषार) पंपसंच, पीव्हीसी पाईप/एचडीपीई पाईप, परसबाग यासाठी अनुदान देय राहील.

या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष

 बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेकरीता लाभार्थीकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सक्षम प्राधिका-यांने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

 नवीन विहीर या बाबीचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थी कडे किमान ०.४० हेक्टर जमीन क्षेत्र असणे आवश्यक . इतर बाबींचा लाभ घेणा-या शेतक-याकडे किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.

 या योजनांतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व बाबींसाठी कमाल क्षेत्र मर्यादा ६.०० हेक्टर आहे.

 शेतक-याच्या नांवे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगर पंचायत , नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रातील लाभार्थी वगळून)

 लाभार्थी कडे स्वत:चे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

 लाभार्थीचे स्वत:चे बॅक खाते त्याच्या आधारकार्डाशी संलग्न असणेआवश्यक आहे.

 बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता ) अधिनियम २००६ नुसार वनपटटेधारक शेतक-यांना प्राधान्य आहे.

 लाभार्थींचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षीक उत्पन्न रु १,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे तसा तहसिलदार यांचेकडून सन २०१९-२० चे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे .