CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : 9 ऑगस्ट ,जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया तर्फे मुरबाड जिल्हय़ातील गोरेगाव येथील पळू विभागातील अंगणवाडीतील मुलांना गणवेष आणि रेनकोट चे वाटप करण्यात आले. तेथील कार्यक्रमात वर्गात कमी प्रकाशात आभ्यास करत असल्याचे लक्षात येताच क्लब मेम्बर्स तर्फे प्रकाशासाठी लाइट्स ची ही सोय करुन देण्यात आली. तसेच तेथील स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही रेनकोट चे वाटप करण्यात आले. एकूण 87 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष दिनेश खरोटे , सचिव राजेश पटेल, रोटरीयन शरद (तात्या) गंभीरराव, रो. महेंद्र भोईर, रो. किरण डहाळे, रो. दिलीप अष्टेकर ई मान्यवर उपस्थित होते. अंगणवाडी तर्फे प्रा. छाया घरत यांनी मान्यवरांचे आभार मानले.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया तर्फे नवनवीन समाज उपयोगी कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. रोटरी इंटरनॅशनल च्या डिस्ट्रिक्ट 3142 अंतर्गत शिफारस केलेल्या उपक्रमापैकी अंगणवाडी अॅडाॅप्शन या उपक्रमाचा हा एक भाग असल्याचे क्लब चे अध्यक्ष दिनेश खरोटे यांनी सांगितले.