CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आज जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीच्या वाघिणींचा शिवसेना करणार सन्मान

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

वर्षभरापासून ओढवलेल्या कोरोना संकटात धिरोत्तर पणे डोंबिवलीकरांची सेवा करणाऱ्या डोंबिवलीच्या काही महिलाअधिकारी व कर्मचारी यांचा आजच्या *जागतिक महिला दिनी शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतर्फे त्यांच्या कर्तव्याचे ठिकाणी जाऊन सन्मान होणार आहे या महिला अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरातील कोरोना संक्रमण कालावधीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत डोंबिवलीकर नागरिकांच्या सेवेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आलेल्या संकटाचा सामना करत जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडल्यामुळे त्या सतत चर्चेत होत्या, या सर्व महिलांनी आम्हा डोंबिवलीकरांची सेवा तर केलीच पण त्यांच्या कर्तव्या मुळे डोंबिवलीकरांची मान उंचावली आहे, आपल्या जीवाची पर्वा न करता डोंबिवलीकरांची सेवा केल्यामुळे आजच्या जागतिक महिला दिनी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा योग जुळून आलेला आहे तमाम डोंबिवलीकरांन तर्फे शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेतर्फे या चारही कर्तबगार महिलांचा त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन योग्य तो सन्मान शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहेत त्यांची थोडक्यात ओळख आम्ही खाली देत आहोत....

१) सौ.राजश्री शिंदे, वाहतुक वरीष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली

पोलीस अधिकारी सौ राजश्री शिंदे यांना गेल्या एक वर्षापासून या कोरोनाच्या संकटात आम्हा डोंबिवलीकर नागरिकांची सेवा करताना रस्त्यावर बघत आहोत, संचार बंदी च्या कालावधीत आणि कोरोना संक्रमण काळ वेगात होता तेव्हा त्या स्वतः, रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करताना आम्हाला दिसत होत्या, अगदी त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असताना कर्तव्य पार पाडत असल्यामुळे घराकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नव्हते,डोंबिवलीच्या वाहतूक यंत्रणेची संपूर्ण धुरा त्याच संभाळत आहेत, अशा अगदी तळमळीने महिला पोलिस अधिकारी पदी कर्तव्य बजावणाऱ्या आमच्या ह्या भगिनीला जागतिक महिला दिनी *शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती तर्फे मानाचा मुजरा

२) सौ रोहिणी लोहकरे:- उप अभियंता, क.डों.म.पा

डोंबिवली जिमखाना येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे अंत्यत कमी वेळात सर्व आधुनिक यंत्रणेने सुसज्ज (कोविड १९ सेंटर)उभे राहिले, अत्यंत कमी वेळात उच्च प्रतीचं उपचार पद्धती असलेले हे कोविड सेंटर डोंबिवली येथे उभे केले. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत होती, महानगरपालिकेने असे एक आधुनिक कोविड सेंटर उभारण्याचे कार्य रोहिणी लोहकरे यांच्या हाती दिले. त्या मॅडमनी ते कार्य अगदी लीलया पार पाडले . आज त्याचा फायदा डोंबिवलीतील हजारो रुग्णांना झाला त्याचे आभार आम्हा डोंबिवलीकरांन तर्फे मानणे गरजेचे आहेच आणि याचे श्रेय जाते ते सौ. रोहिणी लोहकरे यांनाच. आजच्या जागतिक महिला दिनी महानगर पालिकेच्या उप अभियंता सौ.

रोहीणी लोकरे यांना शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेतर्फे मानाचा मुजरा

३) सौ.ज्ञानदा कदम, वृत्त निवेदिका, ABP माझा

कोरोनाच्या संकटात अगदी सुरवाती पासून संचारबंदी लागू होती तेव्हा आपण सर्व घरी बसलो होतो परंतु जगात काय चालू आहे या महाराष्ट्रात काय चालू आहे, डोंबिवलीत काय चालू आहे याचे वृत्त मात्र आपल्याला बातम्यांमधून कळत होते, आपल्या डोंबिवलीची लेक म्हणून प्रसिद्ध असलेली ज्ञानदा कदम या संपूर्ण कोरोना कालावधीत तिला वैशिष्ट्यपूर्ण अशा बातम्या सांगण्याच्या कसबी मुळे सार्‍या मीडिया जगात प्रसिद्ध झाली, संचारबंदी लागू असताना डोंबिवली ते मुंबई असा रोजचा प्रवास करताना आपलं कर्तव्य बजावत असताना ज्ञानदाला शेवटी कोरोनाने घेरलं, परंतु त्यावर सुद्धा मात करून ताबडतोब आम्हा सर्वांना बातम्या देण्यासाठी आमची डोंबिवलीकर *सौ. ज्ञानदा कदम* आपल्या कर्तव्यावर रुजू झाली अशा या आमच्या धाडसी डोंबिवलीच्या लेकीला *सौ.ज्ञानदा कदम ह्यांना आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखे तर्फे* मानाचा मुजरा....

४) डॉक्टर सौ.सुहासिनी बडेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालय,डोंबिवली

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत सुसूत्रता यावी म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वच जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कामगिरी चोख पार पाडली, डोंबिवलीतील जी काही कोविड सेंटर उभी राहिली त्या सेंटरमध्ये डोंबिवलीकर कोरोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्था होण्यासाठी त्यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी जी काही यंत्रणा यशस्वी पणे राबवली त्यात प्रमुख वाटा होता तो शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी *डॉक्टर सौ सुवासिनी बडेकर मॅडम व त्यांच्या टीमचा* , उपलब्ध असलेल्या अगदी तोकड्या यंत्रणेत सुद्धा डोंबिवली येथील कोरोनाग्रस्त रुग्णाला लवकरात लवकर उपचार होण्यासाठी त्यांना त्वरित कोविड सेंटर मध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी जी काही यंत्रणा काम करत होती त्या यंत्रणेच्या प्रमुख म्हणून डॉक्टर सौ.सुवासिनी बडेकर आणि त्यांची टीम दिवस-रात्र राबत होती, डोंबिवलीकरांना तर्फे त्यांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत, तरीही एक छोटासा आभार म्हणून आज जागतिक महिला दिनानिमित्त समस्त डोंबिवलीकरांतर्फे आम्ही शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा त्यांना मानाचा मुजरा करतो..

शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शहरप्रमुख/नगरसेवक,आणि माजी सभागृह नेता श्री.राजेश गोवर्धन मोरे साहेब,नाशिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी,विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, राजेश कदम,कार्यालय प्रमुख सतीश मोडक,महिला शहरसंघटक डोंबिवली (पूर्व) सौ. मंगला सुळे,कल्याण ग्रामीण महिला शहर संघटक कविता ताई गावंड-चौधरी, माजी नगरसेविका सौ.मनीषा धुरी,महिला शहर संघटक डोंबिवली (पश्चिम )सौ.किरण ताई मोंडकर...