CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बुद्रुक येथे शांततेत रस्ता रोको,शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोला बहुसंख शेतकरी हजर

CRIME BORDER | 26 December 2025 | 02:50 PM

बेटावद बुद्रुक येथे शांततेत रस्ता रोको,शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोला बहुसंख शेतकरी हजर


                            


                            

नाशिक विभागीय संपादक : डॉ. शशिकांत काळे / जामनेर तालुका प्रतिनिधी : श्याम अ.पाटील 


     बेटावद बुद्रुक : शेतमालाला योग्य भाव मिळावा, सरसकट कर्ज माफी. ओला दुष्काळ जाहीर करावा व अशा इतर मागण्यासाठी दि.३१/१०/२०२५ रोजी शुक्रवार सकाळी १० वाजता  बेटावद बुद्रुक तालुका जामनेर येथे बस स्थानक चौकात रास्ता -रोको करण्यात आला. रास्ता- रोकोत शेतकऱ्यांनी खराब झालेला शेतमाल हा रस्त्यात टाकुन आंदोलन केले. या कारणामुळे सरकारचे लक्ष हे शेतकऱ्यां कडे केंद्रीत होईल. माजी मंत्री  बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या नागपुर शहरात आदोलनाच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात आला. रास्तारोको मध्ये बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते . शेतकयांची कर्ज माफी, शेत मालाला योग्य तो भाव,  ओला दुष्काळ जाहीर करणे अशा अनेक घोषणा यावेळी  देण्यात आल्या . 


सुभाष ठोंबरे, गुरदास कन्हेरकर , दिपक कान्हे , अविनाश पाटील, प्रकाश गाढे, दीपक कदम, गोपाल कदम, इकबाल पटेल , नाना भोईटे, अमोल ढगे, अजय मराठे , गजानन शिंदे, नितिन दारकोंडे , सुरेश  शर्मा , मनोज लामखेडे , शैलेश गिल,बंडु ढगे , वामन कुंभार, महेंद्र राजपुत, सुभाष धनगर मोहन भोईटे, राजू जैन व इतर शेतकरी सहभागी झाले. 


मालदाभाडी सर्कलच्या मृणाल उंबरकर यांना निवेदन दिल्या नंतर हा रास्तारोको मागे घेण्यात आला  रस्ता रोको मुळे  रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी  लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फत्तेपुर पालीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अंकुश जाधव  यांनी बीट जमादार तडवी ,पो. कॉ सोपान गायकवाड , पो.कॉ सच्चीतानंद अहीरे व पोलीस पाटील , ग्रामपंचायत सरपंच सरपंच  रुपाली दिनकर ठोंबरे ,उपसरपंच  पद्माकर सुरवाडे व सदस्य यांच्या चोख बंदोबस्तात  रस्ता रोको शांततेत पार पडला.