CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Andheri Murder : अंधेरीतील फाईव्ह स्टार हॉटेलात चाकूनं वेटरचा कूकनं केला खून !

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

Mumbai Andheri News मुंबईतील अंधेरीत हत्येच्या घटनेनं खळबळ माजली आहे.विशेष बाब म्हणजे एका प्रतिष्ठीत हॉटेलात काम करणाऱ्या कूकनेच वेटरचा खून केला आहे. ऑर्डरच्या वादातून कूक आणि वेटरमध्ये वाद झाला. यावेळी कूक ज्या चाकूने भाजी कापत होता, त्याच चाकूने त्याने वेटरवर सपासप वार केले. छाती आणि पोटावर वार करत कूकने वेटरचा जीव घेतला. या घटनेनं हॉटेलातील संपूर्ण स्टाफही बिथरला.

Andheri MIDC Police ही धक्कादायक घटना अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील एका पंचतारांकीत हॉटेलात घडली. शुक्रवारी सकाळी हत्येचा हा प्रकार उघडकीस आला. या हत्याकांडप्रकरणी आरोपी कूकला अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास सुरु आहे. रागाच्या भरात हॉटेलच्या कूकने हे कृत्य केलं असल्याचं समोर आलं आलंय. आरोपी कूकला आता न्यायालयात हजर केलं जाणार असून एमआयडीसी पोलीस मारेकरी कूकची कसून चौकशीही करत आहेत. नेमकी घटना काय घडली होती? वेटरने कूकचा जीव घेण्याइतका नेमका वाद काय झाला होता? याचा उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय.

अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका पंचतारांकीत हॉटेलात मूळचा हिमाचलचा असणारा जगदीश वेटरचा काम करत होता. तर बिहारमधील रहिवाशी असणारा माधव गेल्या एक वर्षापासून हॉटेलात कूक म्हणून कामाला लागला होता.गुरुवारी रात्रीच्या सुमारास जगदीश आणि माधव यांच्या जेवणाच्या ऑर्डरवर काहीतरी वाद झाला. हा वाद प्रचंड पेटला होता. पण हॉटेलच्या मॅनेजरने दोघांचीही समजून काढून कसाबसा वाद मिटवला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी माधव आणि जगदीश नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. यावेळी जगदीश किचनमध्ये गेला. तेव्हा माधव भाजी कापत होता. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला. दरम्यान, माधवला राग अनावर झाला आणि ज्या चाकूने तो भाजी कापत होता, त्यानेच जगदीशवर वार करण्यात आले होते.

खळबळ-पाठीत आणि छातीवर वार झाल्याने जगदीशला मोठा मार लागला. प्रचंड रक्तस्त्रावही झाला. किचनमध्ये कूकने जगदीशची हत्या केल्यानं हॉटेलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची हमाति मिळताच, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी जगदीशला रुग्णलयात नेलं. पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अखेर एमआयडीसी पोलिसांनी हत्येप्रकरणी कूक माधव मंडल याला अटक केली असून पुढील तपास केला जातोय.