CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व प्रोबोधन कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) व शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व प्रोबोधन कार्यक्रम संपन्न-विद्यार्थ्यांना मदत नव्हे,तर त्यांना शालेय साहित्य देणे हे आमचे कर्तव्य - संस्थापक राजेंद्र वखरे

डोंबिवली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ,घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन , (एनजीओ) या सामाजिक संस्थेमार्फत विविध ठिकाणी कार्यक्रमा संपन्न होत असून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) व शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ च्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ तालुक्यातील अनुराग सेवा मंडळाच्या अनुराग मुलींचे वस्तीगृह या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व विद्यार्थिनींना अनुराग संस्थेच्या सभागृहात शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष स. पो.निरी. जयेंद्र भोयर , कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी क्राईम बॉर्डर चे पुणे विभागीय निवासी संपादक नितीन सैद , कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमेश काठे व अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्व ,व्यसनाधीनता यावर स.पो. निरी. सुप्रिया देशमुख यांचे व्याख्यान संपन्न झाले.

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी आपली प्रस्तावना मांडताना विद्यार्थ्यांना आपण मदत नव्हे,तर त्यांना शालेय साहित्य देणे हे आमचे कर्तव्य समजतो असे सांगून बेटी बचाव बेटी पढाव, विद्यार्थिनींनी मागे न येता आपल्या कर्तृत्वाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन करून समाजासाठी व देशासाठी एक सुज्ञ नागरिक बना असे सांगितले.अनुराग सेवा मंडळाचे उल्लेखनीय कार्य गेल्या २६ वर्षापासून संस्था विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत व त्यांच्यासाठी विविध सुविधा पुरवीत असल्याबद्दल शाळेच्या ट्रस्टी व प्रिन्सिपल डॉ.ईला पॉल यांचे व शिक्षक वृद्धांचे त्यांनी कौतुक केले ‌. तर आपल्या महान देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, मा.प्रतिभाताई पाटील स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी अशा या अनेक यशस्वी महिला बद्दल सांगून विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

पो. निरी. लक्ष्मण कांबळे यांनी घरोघरी तिरंगा व देशाबद्दलची आपली निष्ठा,आपले कर्तव्य सांगून विद्यार्थ्यांनी खूप शिकून मोठे व्हा हा संदेश दिला .रोटरी क्लब ऑफ विनर्स डोंबिवलीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी गरिबीतून मार्ग काढत आलेल्या संकटावर मात देऊन यश प्राप्त करा असे मनोगत व्यक्त केले .कोकण वसाहत कल्याण (पश्चिम) चे शिवसेना शाखाप्रमुख गणेश कोते यांनी विद्यार्थिनींना व संस्थेला मिलिटरी, नेव्ही, पोलीस भरती याबद्दल मार्गदर्शन करून भविष्यात मदत करण्याचे आश्वासन दिले ,तर ज्येष्ठ शिवसैनिक वसंत खापरे यांनी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून काही मदत लागल्यास आम्ही करू असे आश्वासन दिले.रोटरी क्लब ऑफ विनर्स डोंबिवलीचे मेंबर बॉबी पिंटो यांनी महिला कशातही मागे नसून महिला वर्ग सदैव पुढे होता, आहे, व राहील असे सांगत झाशीच्या राणीचे कर्तुत्व सांगून महिलांचा इतिहास उलगडला .

अनुराग मुलींच्या वस्तीगृहाच्या प्रिन्सिपॉल डॉ.ईला पॉल यांनी संस्था कशा प्रकारे काम करते व विद्यार्थ्यांना मदत करते हे सांगून सुरुवातीला खूप त्रास झाला पण विद्यार्थी घडवून आनंद वाटतो गेल्या २६ वर्षात अनेक मुलं व मुली या वस्तीगृहातून शिकून मोठ्या झाल्याचे त्यांनी सांगितले.

स.पो.निरी.सुप्रिया देशमुख यांनी मुलींना मार्गदर्शन करताना गुड टच व बॅड टच याबद्दल सांगून चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा याबद्दल माहिती दिली. तसेच संकटकाळी 112 नंबर व 100 नंबर याचा वापर कसा करावा याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स. पो. निरी. जयेंद्र भोयर यांनी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करतांना वाईट परिस्थितीला कधीही घाबरू नका ,आलेल्या संकटाला तोंड द्या, कुठल्याही परिस्थितीत शिका व शिकून आपले व आई वडिलांचे, शाळेचे नाव रोशन करून या देशाचे एक चांगले नागरिक बना असा संदेश देत अनुराग वस्ती गृहाचे कौतुक केले.

कार्यक्रमाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे , एपीआय जयेंद्र भोयर , क्राईम बॉर्डर चे पुणे विभागीय निवासी संपादक नितीन सैद, एपीआय सुप्रिया देशमुख , पो.उप.नि.तुळशीराम सावंत ,अनुराग सेवा मंडळाच्या ट्रस्टी व मुलींच्या वस्तीगृहाच्या प्रिन्सिपल डॉ.ईला पॉल , क्राईम बॉर्डरच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी चित्रा उर्फ (श्रावणी) कामत, क्राईम बॉर्डर चे पत्रकार व उद्योगपती रमेश काठे , क्राईम बॉर्डर चे पत्रकार फकिरबा नेव्हार, शिवसेना शाखाप्रमुख कोकण वसाहत कल्याण (पश्चिम) चे गणेश कोते ,ज्येष्ठ शिवसैनिक वसंत खापरे, क्राईम बॉर्डर चे पत्रकार मुकेश म्हात्रे ,रोटरी क्लब ऑफ विनर्स डोंबिवली शाखेचे प्रेसिडेंट निलेश सोनवणे, रोटरी क्लब ऑफ विनर्स डोंबिवली शाखेचे मेंबर बॉबी पिंटो, क्राईम बॉर्डर चे पत्रकार संतोष कोलंबकर, आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा व श्री स्वामी सखा (मैगझिन) च्या संपादिका सौ .सीमा वखरे ,क्राईम बॉर्डरच्या रिपोर्टर व आदर्श चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका सोनाली झोडगे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन गोपनीय शाखेचे या ए . एस . पाटील ,पोलीस शिपाई कैलास पारधी

अनुराग वस्तीगृहाच्या / शाळेच्या मुख्याध्यापिका वि. खंडागळे मॅडम , शिक्षकवृंद सुजाता सोनवणे, भंडारी सर ,रूथ लोखंडे, राजेश सर ,प्रतिभा सिंग ,फुलपगार सर व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाची संकल्पना राजेंद्र वखरे व एपीआय जयेंद्र भोयर व सौ. सीमा वखरे व यांची होती