CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषि विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते आदीबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती कृषि विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास येताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. कृषि निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल,असे श्री. माने यांनी सांगितले. नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी

· विभागीय कार्यालय- ८६९१०५८०९४ toqcthanediv@gmail.com

· ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय-

७०३९९४४६८९ dsaothane.2013@rediffmail.com

· पालघर- ९४०३८२१८७० dsaopalghar@rediffmail.com

· रायगड- ९५०३१७५९३४ dsaoraigad@gmail.com

· रत्नागिरी- ८६६८९७२३३७ dsaortn@rediffmail.com

· सिंधुदूर्ग- ९४०४३०५८४८ saosindhu@gmail.com