CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कुठलाही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करा; 10 लाखापर्यंत अनुदान मिळवा! प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे निकष शिथिल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कुठलाही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करा; 10 लाखापर्यंत अनुदान मिळवा! प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे निकष शिथिल; कोणत्याही पिकावर आधरित उद्योग सुरू करता येणार

ठाणे: - असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना वित्तपुरवठा करून संघटित क्षेत्रात आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अटी केंद्र शासनाने शिथिल केल्या आहेत. त्यामुळे आता एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेतील पिकांबरोबरच इतरही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी या योजनेतून 35 टक्के अनुदान म्हणजे 10 लाखापर्यंतचे सहाय्य मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेत ठाणे जिल्ह्यासाठी नाचणी/वरी पिकावरील प्रक्रिया उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली होती. परंतु आता या योजनेच्या अटी शिथील केल्या असून एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेला प्राधान्य असेल त्याच बरोबर इतर उद्योगांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून नाचणी/वरी ऐवजी शेतकऱ्यांना इतर पिकांवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करता येणार आहे. यामध्ये बेकरी व कन्फेशनरी, स्नॅक्स, लोणची, पापड मसाले, रेडी टू इट, रेडी टू कूक यासारखे प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी व कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण करण्यासाठीही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर इयत्ता आठवी पासची अटही रद्द करण्यात आली आहे.

नाचणी/वरी : एक जिल्हा एक उत्पादन

■ एक जिल्हा, एक उत्पादन म्हणून ठाणे जिल्ह्यात नाचणी/वरी हे पीक निश्चित कले आहे. नाचणी/वरी पिकावर आधारीत प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य दिले जाईल.

■ परंतु आता निकषांत बदल झाल्यामुळे इतर पिकांवरील प्रक्रिया उद्योगांसाठीही मदत मिळणार आहे.

योजनेचे लाभ व अटी काय?

· 18 वर्षावरील वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचतगट तसेच अस्तित्वात असलेले पिकांवर आधारित उद्योग बळकटीकरणासाठी पात्र ठरलेला सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योजक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

· या योजनेचा शहरी तसेच ग्रामीण भागात लाभ घेता येणार आहे. एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के परंतु जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंत क्रेडिट लिंक्ड सबसिडी आधारावर अनुदान मिळणार आहे. लाभार्थी गुंतवणूक 10 टक्के आणि उर्वरित रक्कम बँक कर्ज घेण्यास मुभा आहे.

· त्याचबरोबर शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन/शासकीय संस्थांना सामाईक पायाभूत सुविधेसाठी कमाल 3 कोटी मर्यादेसह पात्र खर्चाच्या 35 टक्के क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी देय असणार आहे.

इथे मिळेल माहिती

या योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर किंवा जिल्ह्यातील जिल्हा संसाधन व्यक्तिंशी संपर्क साधून अर्ज करता येईल. तसेच 9423176095 , 9833055417 , 9422132315 या क्रमांकावर अथवा dsaothanesmart@gmail.com ¾Ö dsaothane.2021@gmail.com ईमेलवर संपर्क साधता येईल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

जिल्ह्यातील जास्तीत जास्त वैयक्तिक . शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, 'स्वयंसहायता बचत गट तसेच उद्योग बळकटीकरणासाठी पात्र ठरलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योजक आदींनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.