CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी फिरते सहज वाचनालय - महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग.

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : कोरोनामुळे मिळालेल्या निवांत वेळेचा उत्तम वापर व्हावा याच विचारातून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ राबविणाऱ्या सहज सेवा फाउंडेशन मार्फत कोरोना रुग्ण ताण तणावापासून मुक्त रहावा व त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा रहावी यासाठी फिरते वाचनालय उपक्रम राबविण्यात आले असून या वाचनालयाचे उदघाटन 23 मे रोजी खोपोलीत लोहाना हॉल येथे करण्यात आले.

या वाचनालयाच्या माध्यमातून हलकी - फुलकी मनोरंजनात्मक पुस्तके, प्रेरणा देणारी चरित्रे,सकारात्मक विचार देणारी पुस्तके, कथा,कादंबरी, धार्मिक ग्रंथ यांचा यात समावेश असून कर्जत व खालापूर तालुक्यातील फिरत्या वाचनालयाच्या या उपक्रमातुन वाचनाचा संसर्ग वाढावा यासाठी सुद्धा या प्रयोगाची मदत होऊ शकते. पुस्तके वाचून झाल्यावर ती सर्व योग्य रीतीने सॅनिटायझर केली जातील.

हाजी अश्रफ शहाबुद्दीन खान फाउंडेशन - कर्जत यांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेल्या सहज रेस्क्यू व्हॅन मधून ही पुस्तके कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून हॉस्पिटलमधील रुग्णांना निशुल्क काही दिवसांसाठी परत देणे तत्वावर पोहोचवली जाणार आहेत.यासाठी राष्ट्र सेवा तालुका वाचनालय, खालापूर व निलेश बाणखेले यांचे विशेष सहकार्य लाभले असून 23 मे रोजी लोहाना हॉल - खोपोली येथे रायगड भूषण ह.भ.प.रामदास पाटील महाराज व सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांच्या हस्ते या वाचनालयाचे उघ्दाटन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,खोपोली युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अतुल पाटील,राजेंद्र फक्के,मोइन शेख,राकेश ओसवाल, जी.आर.भोसले,मोहन केदार,मंगेश सुखदरे,शार्दूल देशमुख,शैलेश विठलानी,दत्ता गिरी,रवींद्र कानेटकर,परेश मजेठीया,निलेश मोडवे व सहज सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.