CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर-रिपोर्टर) : डोंबिवली (प.) येथील सेंट झेवियर्स शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असलेले वाचमेन रवींद्र पुजारे वय वर्ष 70 यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय शालेय समितीने घेऊन सुखद धक्का दिला.मोठ्या सन्मानाने 70 वर्षीय काकांच्या हस्ते सेंट झेवियर्स शाळेमध्ये तिरंगा फडकला.
यावेळी शाळेचे सचिव महेश भोईर ,उपाध्यक्ष संतोष भोईर,प्राचार्य गणेश भोईर तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वसंता सतीश कुमार ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सायली सचिन पळसकर तसेच बालवर्गाच्या मुख्याध्यापिका सौ. मेरी शंकर वारकर तसेच शाळेतील कर्मचारी सौ .सविता भांडारकर, अमृता घाडीगावकर श्रेया बने, रेश्मा सावंत, संतोष साबळे व आदी ध्वजारोहणाला उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्य घटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवस सुरू होते .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले १५ ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारतात लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं .भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे माहित असणे फार गरजेचे आहे असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले .
सकाळी साडेनऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.सध्याच्या कोवीड १९ या परिस्थितीमुळे विद्यार्थी वर्ग तसेच नागरिकांना बोलावू न शकल्याची खंत व्यवस्थापनाने व्यक्त केली.