CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विष्णूनगर पोलीसांची धडाकेबाज कारवाई खुनाच्या गुन्ह्यातील सव्वादोन वर्ष फरारी आरोपींना अटक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली(क्राईम बॉर्डर प्रतिनिधी):ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ३,कल्याण अंतर्गत असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्याचा पदभार तत्कालीन उल्हासनगर क्राईम ब्रँचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी नुकताच हाती घेतला आहे.

व.पो.नि साबळे यांचे सतर्क खबरे व नेटवर्क स्ट्रॉंग असल्याने यापूर्वी त्यांनी बरेच खतरनाक गुन्हे उघड केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे .त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील मागील महत्त्वाच्या फायलीचा अभ्यास करून काम सुरू केले आहे ‌.खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा त्यांनी तपास त्यांच्या पद्धतीने सुरू केला.

विष्णुनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. दिनांक २९ जुलै २०१८ रोजी हद्दीत शिव महेश को-ऑपरेटिव्ह सोसायटी सखाराम कॉम्प्लेक्स जुनी डोंबिवली पश्चिम येथे यातील फिर्यादी रोहिदास जोशी वय १९ राहणार जनक सोसायटी शास्त्री नगर डोंबिवली पश्चिम व त्याचा मित्र सौरभ त्याने पाठवलेल्या व्हाट्सअप मेसेज वरुन आरो पीत व पाहिजे आरोपी यांनी त्याचे जवळील मोटारसायकलवरून हातात तलवार ,चाकू ,लाठ्या-काठ्या ,कोयता घेऊन गैर कायद्याची मंडळी जमवून हल्ला करण्याच्या इराद्याने येऊन फिर्यादीचे काका मयत कुंदन जनक जोशी व मुकेश जनक जोशी व इतर यांचे वर प्राणघातक हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. सदर वेळी झालेल्या हल्ल्यात फिर्यादी यांचा काका कुंदन जनक जोशी यांना वरील इसमांनी संगणमत करून जीवे ठार मारले होते.

वरील प्रकाराबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७५/२०१८ भारतीय दंड विधान कायदा कलम 302, 307 ,326 ,324, 506, (2 ),143, 144 ,146,ते 149 सह म‌.पो.का . कायदा 37 (1) 35 सह शस्त्र अधिनियम 1957 चे कलम 4/ 25 या प्रमाणे दाखल होता.गुन्हा घडल्यापासून खालील पाहिजे असलेल्या आरोपीत १) विशाल सुरेश गायकवाड वय 24 व २) अरविंद कामताप्रसाद वय 21 हे सदर गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी होते. पण ते फरार असल्याने पोलीसांना मिळून येत नव्हते.

या गुन्ह्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी त्यांचे खबरे गुप्त माहिती दार यांना कामाला लावले आणि अल्पावधीतच दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत गस्त घालत असताना व .पो.नि. साबळे यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी विशाल गायकवाड व अरविंद प्रसाद हे डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर भागात येणार असल्याची खात्रीशीर बातमी दिली .

सदर बातमीची माहिती त्यांनी डीसीपी विवेक पानसरे व एसीपी जे.डी. मोरे यांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. संजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय गणेश लढणे ,पो. हवा. युवराज तायडे,विनोद निकम,राजेश बनसोडे,शशिकांत नाईक पो.ना.राजेंद्र पाटणकर ,भगवान सांगळे पो.शि.कुंदन भामरे ,सचिन कांगणे ,मनोज बडगुजर,महाजन यांनी शास्त्रीनगर परिसरातील झोपडपट्टी कोपर रोड डोंबिवली पश्चिम याठिकाणी साध्या वेशात गुप्त सापळा रचला आणि पाहिजे असलेले आरोपी अलगत या सापळ्यात अडकले .

परंतु विशाल व अरविंद यांच्या लक्षात आले की पोलीस आपल्या मागावर आहे.तसा त्यांनी पळ काढला पण पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.व‌.पो.निरी.संजय साबळे त्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असून लवकरच ते त्यांना अटक करतील.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांची ची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, माझ्या हद्दीत कुठल्याही प्रकारची दादागिरी चालणार नाही व कोणतेही अवैद्य धंदे चालणार नाही. यावर माझे लक्ष राहणार आहे कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. त्यांच्या कामगिरीमुळे जनतेत सकारात्मक भूमिका दिसत आहे.

सदरची महत्त्वपूर्ण कारवाई कल्याण परिमंडळ ३, कल्याण चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे तसेच डोंबिवली विभागाचे एसीपी जे.डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व.पो.निरी.संजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय गणेश वडणे पोलीस हवा.युवराज तायडे,विनोद निकम पो.हवा.राजेश बनसोडे,शशिकांत नाईकरे,पो.ना.राजेंद्र पाटणकर पो.ना.भगवान सांगली पो.शि.कुंदन भामरे,सचिन कांगणे,बडगुजर,महाजन यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात कामी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले.