CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे दि.08 :मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण मा. बी. सी. खटुआ समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी व शासनाने मान्यता दिलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने टॅक्सी / ऑटोरिक्षा भाडेदर वाढीच्या सुत्रानुसार सादर करण्यात आलेल्या भाडेदर वाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यानुसार काळी-पिवळी टॅक्सीसाठी किमान देय भाडे रु.22/- वरून रू. 25/- व ऑटोरिक्षा (सी.एन.जी.) साठी पूर्वीचे किमान भाडे रु.18/- वरुन रु.21/- निश्चित करण्यात आले आहे.
ऑटोरिक्षा / टॅक्सी मीटरचे रिकॅलिब्रेशन दिनांक 01 मार्च 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत करण्याचे निर्देश मा. प्राधिकरणाने दिले आहेत. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मुंबई महानगर क्षेत्रातील जे टॅक्सी / ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारित भाडेदरानुसार भाडेमीटरचे पुर्न:प्रमाणिकरण (रिकॅलिब्रेशन) करून घेतील त्यांच्या मीटर पासिंगसाठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सींच्या नोंदणी क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार या कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक -0 आहे त्यांनी दि.7 मार्च 2021 रोजी उपस्थित राहावे, वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-1 आहे त्यांनी दि. 8 मार्च 2021 ते 14 मार्च 2021 रोजी उपस्थित राहावे, वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-2 आहे त्यांनी दि. 15 मार्च 2021 ते 21 मार्च 2021 रोजी उपस्थित राहावे,वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-3 आहे त्यांनी दि. 22 मार्च 2021 ते 28 मार्च 2021 रोजी उपस्थित राहावे,वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-4 आहे त्यांनी दि. 28 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 रोजी उपस्थित राहावे,वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-5 आहे त्यांनी दि. 05 एप्रिल 2021 ते 11 एप्रिल 2021 रोजी उपस्थित राहावे.वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-6 आहे त्यांनी दि. 12 एप्रिल 2021 ते 18 एप्रिल 2021 रोजी उपस्थित राहावे.वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-7 आहे त्यांनी दि. 19 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 रोजी उपस्थित राहावे.वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-8 आहे त्यांनी दि. 26 एप्रिल 2021 ते 02 मे 2021 रोजी उपस्थित राहावे.वाहनाचा नोदणी क्रमांकाचा शेवटचा अंक-9 आहे त्यांनी दि. 03 मे 2021 ते 09 मे 2021 रोजी उपस्थित राहावे.
या कार्यालयामार्फत वरीलप्रमाणे भाडेदरवाढीनुसार भाडेमीटरचे पुर्न:प्रमाणिकरण (रिकॅलिब्रेशन) केलेल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या मीटर पासिंगसाठी नियोजन करण्यात आले आहे याची संबंधीत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी मालक / चालक व ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संघटना यांनी नोंद घेऊन नेमूण दिलेल्या कालावधीत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी मीटर पासींगसाठी कार्यालयात आणाव्यात जेणेकरून "राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड- १९) च्या प्रार्दुभावामुळे जारी करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करून दिलेल्या मुदतीत कामकाज पूर्ण करणे या कार्यालयास शक्य होईल.
जे टॅक्सी / ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमीटरचे पुर्न:प्रमाणिकरण (रिकॅलिब्रेशन) न करता तसेच सुधारित भाडेदरानुसार भाडेमीटरची पुर्:प्रमाणिकरण (रिकॅलिब्रेशन) करून या कार्यालयाकडून मीटर पासींग न करता सुधारित दराने भाडे आकारणी करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी केले आहे.