CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
डोंबिवली : मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिल नथुराम गायकवाड यांना शालेय जीवनापासूनच आपण देशासाठी काहीतरी करावे असे वाटत होते. त्यातल्या त्यात त्यांना खाकी वर्दी खुणावत होती. अनिल गायकवाड यांचे मुळगाव- काळुंद़े, तालुका पनवेल जिल्हा रायगड त्यांचे प्राथमिक शिक्षण पनवेल या ठिकाणी झाले तर पुढील शिक्षणासाठी त्यांनी ठाणे गाठले. त्यांनी ठाणावाला कॉलेज येथे ज्युनियर कॉलेज पूर्ण केले . त्यांनी एम ए हिस्ट्री मध्ये पदवी सन २००१ ला ए एस सी कॉलेज ,पनवेल जि. रायगड येथून प्राप्त केली आहे.
आपण जीवनात असे काहीतरी करूया की आपल्या कुटुंबाला व समाजातील लोकांना आपला अभिमान वाटावा एवढेच नव्हे तर आपण कुणाला न्याय देऊ शकू असे कार्य करावे, असे त्यांना नेहमी वाटत होते.ते १९९६ साली नवी मुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले.नवी मुंबई पोलीस दलात १९९६ ते २०१० पर्यंत पनवेल शहर ,कळंबोली ,नेरुळ पोलीस ठाणे येथे नोकरी केली.
त्यांना वाटायचं की आपण पोलीस खात्यात गोरगरिबांना न्याय देऊ शकतो म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि २००८ मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा क्रॅक केली दिनांक १२ सप्टेंबर २०१० ला नाशिक पोलीस ॲकॅडमी मध्ये ट्रेनिंगला गेले .त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून सन २०११ मध्ये विक्रोळी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली.तिथे त्यांनी सन २०११ ते २०१४ पर्यंत डिटेक्शन ब्रांचला काम केले.त्यानंतर त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर प्रमोशन होऊन ते देवनार पोलीस ठाण्यात सन २०१४ ला पदोन्नतीवर गेले तिथे त्यांनी सन २०१४ ते २०१७ या कार्यकालात तिथेही डिटेक्शन ब्रांचचे काम पाहिले .तेथून त्यांची बदली दिनांक १२/७/२०१७ रोजी मुंबई क्राईम ब्रँच चेंबूर युनिट ६ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून झाली. ही त्यांच्या साठी मोठी संधी होती.तिथेही त्यांनी उत्तम प्रकारे डिटेक्शन केले तेथून त्यांची बदली घाटकोपर क्राईम ब्रांच युनिट नं. ७ येथे सप्टेंबर २०२१ मध्ये बदली झाली .
चेंबूर क्राईम ब्रँच येथे नेहरूनगर पोलीस ठाण्याचा गुन्हा नोंद क्रमांक १३१/ १९ हा त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सखोल तपास केला.देवनार पोलीस ठाणे येथे असताना एक महिन्याच्या लहान मुलीचे अपहरणाचा गुन्हा कुशलतेने त्यांनीं उघडकीस आणून चार आरोपींना गुन्ह्यात अटक केली होती . त्याबाबत वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पोलीस खात्यात कार्य करत असतांना त्यांनी नेहमीच वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले. त्यांना आतापर्यंत ५५ रिवार्ड मिळाले असून यातील ३ पोलीस आयुक्त यांच्या कडून क्राईम ब्रँच ला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ४ प्रशंसापत्र देण्यात आले.
अशा या हरहुन्नरी अनिल गायकवाड यांची दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी आर.ए.के.मार्ग पोलीस स्टेशन वडाळा ,मुंबई (प.) या ठिकाणी पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली.त्यांचा घाटकोपर क्राईम ब्रँच युनिट ७ ने २६ फेब्रुवारी २०२२ रोजी सेंड ऑफ करुन त्यांना पदोन्नतीच्या शुभेच्छा दिल्या तर आर.ए.के.मार्ग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. कुमुद कदम यांनी त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे गेल्या २६ वर्षापासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत.या सर्व कार्याचे श्रेय त्यांचे आई, वडील व पत्नी सौ. शितल अनिल गायकवाड यांना देतात ते पोलीस खात्यातील आपले आदर्श म्हणून पोलीस महासंचालक अरविंद इनामदार व संजय पांडे यांना मानतात.
ते नवतरुणांना संदेश देऊ इच्छितात की आपण देशासाठी व समाजासाठी उत्तम कार्य केले पाहिजे .आपण भारत देशाचे ऋणी आहोत. एवढेच नव्हे तर आपण खुप भाग्यवान आहोत की, या देशात जन्मलो म्हणून देशसेवा करण्यासाठी सर्वांनी आपल्या कुटुंबातील किमान एक तरुण किंवा तरुणीला महाराष्ट्र पोलीस , पोलीस फोर्स, आर्मी ,नेव्ही ,बीएसएफ अशा ठिकाणी जाऊन देश सेवा करावी असा ते संदेश देतात.
त्याच बरोबर त्यांनी देवनार पोलीस ठाणे येथे असताना सन २०१४ मध्ये घडलेल्या उमर फारूक शेख या सामाजिक कार्यकर्त्यांचा हत्याकांडात तपास करून करून सादर केलेल्या पुरावे द्वारे माननीय सत्र न्यायालय नं.२४, मुंबई यांनी ०४ आरोपीना आजीवन कारावासाची व दंडात्मक शिक्षा दिली आहे.फारूक हत्याकांडातील सर्व आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून सर्व पुरावे वेळेत दाखल केल्याने त्या सर्वांना आजीवन कारावासाची शिक्षा मिळवून दिली.
विशेष म्हणजे मुंबई क्राईम ब्रँच चेंबूर युनिट ६ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यरत असतांना नेहरूनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०१९ हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपींची धरपकड त्यांनी केली होती. त्यांच्या या कार्याची दखल मुंबई पोलीस आयुक्त यांनी घेऊन त्यांचे कौतुक केले होते.त्यांच्या या उत्तम कामगिरीची मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यांना रुपये ३०००/- देऊन त्यांचा सन्मान केला.
अशा या हरहुन्नरी अनिल गायकवाड यांची दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे क्राईम बॉर्डर परिवारातर्फे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा त्यांच्या या पदोन्नतीनचे त्यांच्या कुटुंबातील पत्नी शितल अनिल गायकवाड व आई ,भावंडे व नातेवाईक व मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या.