CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- डोंबिवलीतील सुभाष रोड वरील दत्तू जोशी बिल्डीग ही इमारत अतिधोकादायक झाल्याने निष्कासित करतेवेळी नागरिकांची गर्दी होऊ नये व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कुंभारखान पाडा रोडने डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशनकडे येणारे व जाणारे मार्गावरील वाहतूक दि. 30 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वा. पासून ते दि. 31 मार्च 2022 रोजी सायंकाळी 20.00 वा. पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील दिली आहे.
या परिसरातील वाहतुकीमध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहे.
प्रवेश बंद- कुंभारखान पाडा येथून डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशनकडे सुभाष रोडने येणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी नवापाडा चौक (बालीविष्णुप्रसाद चौक) या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदरची वाहने ही नवापाडा चौक (बालीविष्णुप्रसाद चौक) या ठिकाणाहून डावीकडे वळण घेऊन गणेश नगरकडुन, 52 चाळ मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद- डोबिवली पश्चिम रेल्वे स्टेशनकडून सुभाष रोडने नवापाडा / कुंभारखान पाडा येथे जाणारी वाहतुक सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मारूती मंदिर जवळ (नाना शंकर शेठ चौक) प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदरची वाहने ही मारूती मंदिर जवळ (नाना शंकर शेठ चौक) या ठिकाणाहुन डावीकडे वळण घेऊन कोल्हापुरे चौकातुन महात्मा फुले मार्गे इच्छित स्थळी जातील.
ही वाहतुक अधिसूचना दि.30 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 ते 31 मार्च 2022 रोजी सायंकाळी 20.00 वाजेपर्यंत इमारतीचे निष्कासन होईपर्यंत अंमलात राहील, असे वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त श्री. पाटील यांनी कळविले आहे.