CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक समाज संघटना,डोंबिवलीच्या सन २०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली नाभिक समाज संघटनेच्या दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन नववर्षाच्या पूर्वसंध्येला कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख,नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथमच डोंबिवली नाभिक संघटनेच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. नूतन कार्यकारिणीने नाभिक समाज संघटनेची दिनदर्शिका असावी.यासाठी समाजातील सर्वांशी चर्चा करून दिनदर्शिका प्रकाशित करण्याचे ठरविले होते.

प्रकाशनाच्या वेळी डोंबिवली नाभिक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब राऊत, उपाध्यक्ष रमेश वखरे,सचिव मंगेश पोफळे (सर), खजिनदार बाळा पवार, अशोक अतकरे, तुषार शिंदे,महेश काशीद, शिवाजी वैद्य,सोमनाथ वरपे,कृष्णा कदम, कृष्णा कारुडकर,संतोष आवटे,दशरथ चित्ते, उपस्थित होते.

दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजातील थोर व्यक्तिमत्वांची ओळख समाजापर्यंत पोहोचावी हा हेतू नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता त्या अनुषंगाने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रकाशनाच्या वेळी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली की, दिनदर्शिकेच्या उत्पन्नातून व नाभिक संघटनेच्या वतीने नाभिक समाजातील जी व्यक्ती कोवीड संसर्गाने मृत्यू पावली आहे. अशा व्यक्तीच्या घरातील इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्चातील २५ टक्के वाटा नाभिक समाज संघटना डोंबिवली उचलणार आहे.याद्वारे समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मुळे नाभिक समाजाचा उत्साह संचारला आहे. यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब राऊत यांनी सांगितले.