CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
नवी मुंबई ( V.SHIVAM ) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक सोनसाखळ्या चोरीच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत असल्याने या भुरट्या चोरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.सदर बाब पोलीस आयुक्त बिपीन कुमारसिंह यांच्या लक्षात आली असता त्यांनी तातडीने अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बी.जी .शेखर पाटील, डिसीपी (गुन्हे) प्रवीण पाटील, एसीपी विनोद चव्हाण(गुन्हे) यांची तातडीची मिटींग बोलावली व सर्व गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकना सदर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या .
त्यानुसार यासाठी विशेष पोलीस पथकही तयार करण्यात आली .मागील आठवड्यातच गुन्हे शाखा कक्ष -२ यांनी अशा प्रकारच्या सोनसाखळ्या चोरी करणाऱ्या टोळीला मोठ्या शिताफीने पकडले व सोनसाखळ्या चोरांकडून २० लाखांचे दागिन्यांसह नवी मुंबई आयुक्तालयातील सोनसाखळी चे २० गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणलेले आहे.
या टोळीतील आणखी इतर काही सदस्यांना अटक करणे बाकी होते. त्यांच्या मागावर नवी मुंबई गुन्हे शाखा नजर ठेवून होती, गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी यापूर्वी क्राईम बीट सांभाळले असल्याने त्यांचे नेटवर्क खूप मोठे आहे . याचाच फायदा त्यांना झाला त्यांनी या कामी अशा सोनसाखळ्या चोराबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या गुप्त खबऱ्यांना कामाला लावले. त्याचा परिणाम असा झाला की ,नवी मुंबई आयुक्तालयातील २० जबरी चोरीच्या सोनसाखळी गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सदर टोळीचा मोरक्या मोहम्मद बशीर शकील, वय वर्षे २८ हा मागील दोन दिवसापासून पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी मानखुर्द येथे न राहता बेलापूर ,उलवा परिसरात रिक्षा चालवत असल्याची गुप्त माहिती खबर्याने त्यांना दिली.
सदर माहितीच्या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी .शेखर पाटील यांनी आखून दिलेल्या पद्धतीने बेलापुर व उलवा परिसरामध्ये गुन्हे शाखा अक्षय २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सपोनि संदीप गायकवाड ,शरद ढोले ,प्रवीण फडतरे यांची स्वतंत्र पथके तयार केली व त्यांना गुप्तपणे त्या परिसरामध्ये सापळा लावण्यात आदेश दिले.
त्यानुसार दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी नमूद २० मोठ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी व सदर टोळीचा मुख्य मोहम्मद शब्बीर शकील शेख ,वय वर्षे २८ हा रिक्षा क्रमांक .एम .एच. ४३ बी. आर . १५०७ सह बेलापूर गावांमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली असता त्यांनी त्या ठिकाणी साध्या वेशात गुप्तपणे सापळा रचून त्याला पकडले परंतु त्याने पोलीसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असता पोलीसांनी मोठ्या शिताफीने त्याला चतुर्भुज केले व त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टाच्या आत डाव्या बाजूस कंबरे जवळ १ विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतूस बेकायदेशीररित्या बाळगलेले मिळून आले म्हणून सदर अट्टल गुन्हेगार मोहम्मद शब्बीर शकील शेख राहणार कृष्णा भेंडे चाळ ,रूम नंबर ७, जुई गाव ता. पनवेल, जि. रायगड त्याच्याविरुद्ध एन आर आय पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
covid-19 या आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळातील लॉक डाऊन नंतर नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या होत्या.वपोनि. गिरीधर गोरे यांनी त्यांचे कसब पणाला लावून आरोपींना अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह ,अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे) डॉ.बी.जी. शेखर पाटील ,डीसीपी (गुन्हे) प्रवीण पाटील ,एसीपी (गुन्हे) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष- चे वपोनि. गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय गणेश कराड, संदीप गायकवाड ,शरद ढोले ,प्रवीण फडतरे ,पोलीस हवालदार सुनील साळुंखे ,मधुकर गडगे ,सचिन पवार सत तुकाराम सूर्यवंशी, पो.ना.रुपेश पाटील , इंद्रजीत कानु , प्रवीण भोपी, सचिन पाटील यांनी यशस्वी कामगिरीत भाग घेतला.