CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
माटुंगा : मध्य रेल कारखाना माटुंगा मधील कामगार बंधु आणि भगिनीच्या सहकार्याने १२ एप्रिल २०२२ रोजी व्हिल शाँप मघ्ये डाँ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान ने सयुक्त जयंती दिना निमित्त कंत्राटी कामगारांच्या मुलांना मोफत वह्या व कंपास पेटी वाटून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिप्रेत असलेली सयुक्त जयंती साजरी केली.
प्रतिष्ठान ची उदिष्टे:- गरीब व गरजु लोकांच्या शैक्षणिक व सामाजिक उत्कर्षासाठी प्रयत्न करणे. जातीपातीत, गटा-तटात विभागले गेलेल्या समाजाला एकत्र करूणे. समाज सेवेची आवड असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन सामाजकार्य करण्यासाठी प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली आहे. शिका संघटीत व्हा व संघर्ष करा अशी बाबासाहेबांची शिकवण अंगारखावी असे प्रतिपादन प्रतिष्ठाणचे मुख्य मार्गदर्शक अनिल नाईक साहेब यांनी आपल्या भाषणात केली. कार्यक्रमांची सुरुवात आयु. संघदीप बोरगे यांनी त्रिशरण पंचशिल करून केली. तसेच आयु. भगवान खैरे साहेब यांच्या वतीने पेढे वाटण्यात आले.
या वेळी व्हील शॉप चे सर्व सीनीयर सेक्शन इंजिनीअर उपस्थित होते. विशेष उपस्थिती ए एम सी टी ( ACMT) डिगरसे साहेब यांच्या हस्ते कंत्राटी कामगारांच्या मुलांसाठी वह्या व कंपास पेटी देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निळकंठ वाघमारे यांनी केले. सर्व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने, फुला ऐवजी पेन देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाला सफल करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष - प्रदिप पाटील. सचिव- विशाल रमन आहेर. कुणाल पगारे, राहुल गणवीर, भारत अभंग, सचिन सोरटे, दिनेश आढाव, निलेश विधाते, संघदीप बोरगे, सुशिल आर्या, अनिल धांडे, इंद्रकुमार यांनी मेहनत घेतली व आभार प्रदर्शन संघदीप बोरगे यांनी मानले.