CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे दि.२७ : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यांत येतो. परंतु राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
त्यानुसार ठाणे जिल्हयांतील सोमवार दिनांक ३ मे २०२१ रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे.असे ठाणे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) बाळासाहेब वाकचौरे यांनी कळविले आहे.