CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आणीबाणीच्या कालावधीत बंदीवास भोगलेल्या नागरिकांनी सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे, दि. 26 : - सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा व्यक्तिंना राज्य शासनाच्यावतीने मानधन मंजूर करण्यात येते. मिसा / डी. आय. आर. (आणीबाणी) राजनैतिक अथवा सामाजिक कारणांसाठी अटक केलेल्या महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या व ठाणे जिल्ह्यात वास्तवास असलेल्या अशा व्यक्ती ज्यांनी यापूर्वी सदर सन्मान योजनेसाठी अर्ज सादर केले नाहीत अशा व्यक्तींनी ३१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर सूचनेद्वारे कळविले आहे की, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्रमांक निवृवे १०१५/प्र.क्र.२६१/२०१५(२०१८)/ स्वासैक-१, दि. ०३ जुलै २०१८ अन्वये मिसा / डी. आय. आर. (आणीबाणी) राजनैतिक अथवा सामाजिक कारणांसाठी अटक केलेल्या व्यक्तींना मानधन मंजूर करण्याचे अधिकार संबंधीत जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या व ठाणे जिल्हयात वास्तवास असलेल्या अशा व्यक्ती ज्यांनी यापुर्वी सदर सन्मान योजनेसाठी अर्ज सादर केले नाहीत अशा व्यक्तींनी शासन निर्णयात विहित केलेले अर्ज व शपथपत्र सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, जिल्हा सत्र न्यायालयासमोर, कोर्टनाका, ठाणे या कार्यालयाकडे दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.