CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली पश्चिमेत एक कॅमेरा आपल्या देशासाठी - नागरिकांना मोफत कॅमेरे वितरण कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : एक कॅमेरा आपल्या देशासाठी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी या संकल्पनेवर आधारित डोंबिवली पश्चिम मधील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १००० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मोफत वितरण नुकतेच करण्यात आले.हे कॅमेरे चिंचोळ्याचा पाडा , खाडी परिसर, रागाई मंदिर व परिसरामध्ये १४०इमारती तसेच सत्तर चाळींच्या परिसरात बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा तपास करणे अधिक सोयीस्कर होणार असून समाजकंटकांना चाप बसणार आहे.

डीसीपी सचिन गुंजाळ कल्याण परिमंडळ -३. यांनी आपल्या झोनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आपापल्या परिसरात असलेल्या सोसायट्या, धार्मिक स्थळ, व्यापारी संकुल,रुग्णालय, कॉलेज, शाळा,बँका ,हॉटेल, बस स्टँड रिक्षा स्टॉप आदी अशा महत्त्वाच्या ठिकाणी एक कॅमेरा सोसायटी शाळा किंवा इमारतीच्या बाहेर रस्त्यावरील दृश्य टिपण्याचा उद्देशाने लावण्यात यावे असे आवाहन डिसीपी गुंजाळ एसीपी मोरे यांनी केले होते . सदर काम हे गेल्या एक महिन्यापासून सुरू होते. या उपक्रमासाठी तातडीने माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी अर्थसहाय्य केले.

विष्णुनगर पोलीस स्टेशन - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांच्या देखरेखखाली माजी नगरसेवक मा. विकास गजानन म्हात्रे तसेच नगरसेविका मा. कविता विकास म्हात्रे ह्यांच्या नागरिकांबद्दल असलेल्या कर्तव्यभावनेतून, एक कॅमेरा ! आपल्या देशासाठी !! आपल्या समाजाच्या सुरक्षेसाठी !!! ह्या सामाजिक धोरणाचा पाठपुरावा करत काल मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सन्मा .श्री जे.डी. मोरे ,तसेच मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सन्मा. श्री. पंढरीनाथ भालेराव साहेब ह्यांच्या हस्ते प्रभागात मोफत सीसीटीव्ही कॅमेरा वाटप करण्यात आले.

या कॅमेऱ्यामुळे समाजकावर लक्ष ठेवता येणार आहे. या स्तुत्य उपक्रमात योगदान देत शहर सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा पोलिसांतर्फे करण्यात आली असून एसीपी मोरे यांनी पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांना खूप मोठी मदत होणार आहे असे सांगून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी याचा फायदा होईल म्हणून लोकप्रतिनिधींनी या अशा उपक्रमात योगदान देण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले. उदाहरणादाखल ते म्हणाले की टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेच्या खुनाचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने अवघ्या १३ तासात करता आला होता तसेच सोनसाखळ्या चोरीच्या घटनांना यासाठी आळा बसेल असे ते म्हणाले.याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.