CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

करोना योद्धा केमिस्ट रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद ब्रह्मविद्या च्या माध्यमातून करोना वर नियंत्रण आणूया जगन्नाथ शिंदे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम): करोना योद्धा ची जवाबदारी अखंडित पणे पार पडणाऱ्या डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशन च्या एफडीए, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट सहकार्य ने आयोजित ब्लड डोनेशन कॅम्प ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.१११ रक्तबाटल्या संकलित करण्यात आल्या. ब्रह्म विद्या,योगविद्या च्या माध्यमातून आपण करोना या आजारावर नियंत्रण आणू शकतो आणि आपल्याला रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रम साठी उत्साह निर्माण होतो असे प्रतिपादन अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

डोंबिवली येथील रोटरी भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.अन्न व औषध प्रशासन चे सहा. आयुक्त प्रवीण मुंधडा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. समारोप प्रसंगी जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थिती दिली. आजच्या परिस्थितीत ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे नाव केमिस्ट संघटनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. जीवनाची लाईफ स्टाईल एकप्रकारच्या जैविक युद्धामुळे बदलली आहे. आपण योग आणि ब्रह्म विद्या ला आपलेसे करून घेतल्यास कोणतीही व्याधी आपल्याला जखडणार नाही असे मत त्यांनी यावेळी मांडले.

अन्न व औषध प्रशासन चे सहा. आयुक्त प्रवीण मुंधडा यांनी आजच्या परिस्थितीत रक्ताची नितांत गरज होती असे कॅम्प प्रत्येक शहरात होणे गरजेचे आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही उक्ती सफल करण्यात डोंबिवली केमिस्ट ने दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. ब्लड कॅम्प यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख निलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे, खजिनदार राजेश कोरपे यांनी परिश्रम घेतले.