CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली:आयडीबीआय बँकेत खातेदारांना गंडा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : आयडीबीआय बँकेच्या डोंबिवली पुर्व शाखेत ४०खातेदारांना आँनलाईन गंडा घालण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी खातेदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या विषयी बँकधिकारी यांनी मौन बाळगले आहे.

आयडीबीआय शाखा डोंबिवली पुर्व फडके रोड येथे बँकेची शाखा आहे. सदर शाखेत अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्याची बातमी वा-यासारखी पसरली त्यामुळे गुरुवारी बँकेत गर्दी झाली. एक दोन नव्हे तर अनेकांचे पैसे आँनलाईन पध्दतीने काढण्यात आले.गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्रकार घडला होता.दोन दिवस बँका बंद असल्याने खातेदारांनी गुरुवारी सकाळी बँकेत धाव घेतली होती.४०जणांनी तक्रार केली असली तरी ५०खातेदारांच्या खात्यातून पैसे काढल्याची माहिती पुढे आली आहे. आधीच कोरोनाचे संकट असतानाच ह्या बँक खात्यातील पैसे लंपास झाल्याने खाते दार चिंतेत पडले आहेत. याप्रकरणी छडा लागलाच पाहिजे अशी खातेदारांनी बँकधिकारी यांच कडे जोरदार मागणी उचलून धरली आहे