CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महिला व बाल विकास विभागा मार्फत बाळंतविडा, हिरकणी कक्ष, बालकोपरा उपक्रमांचा शुभारंभ

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे वीटभट्टी वर गरोदर, स्तनदा, किशोरी व 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी ठाणे दि. १९ : मुरबाड गटातील पोटगाव येथील वीटभट्टीवर शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत गरोदर महिलासाठी बाळंतविडा,स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष व बालकांसाठी बालकोपरा या वैशिष्ट्य पूर्ण उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांचे समन्वयातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

बाळंतविडा

आरोग्य तपासणी दरम्यान गरोदर महिलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्याचे साधारणतः दिसून येते. तेव्हा गरोदर महिलांना लोहयुक्त आहार मिळावा यासाठी बाळंतविडा वितरण करण्यात आले. बाळंतविडा मध्ये पालक, अळु, बिट, शेवग्याच्या शेंगा, शेवगा पाने आणि खजूर असा लोहसमृद्ध आहार महिलांना नियमितपणे ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार आहे.हिरकणी कक्ष स्तनदा मातांना बाळास स्तनपान देताना सावली व आरामदायी व्यवस्था असावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

बाल कोपरा 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना उन्हाचा मातीचा त्रास होऊ नये यासाठी वयोगटानुरूप खेळणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.लोकसहभागातून वीटभट्टी वरील सर्व बालकांना नवीन कपड्यांचा संच देण्यात आला. या ठिकाणी राबविण्यात आलेली बाळंतविडा, हिरकणी कक्ष, बाल कोपरा या अभिनव संकल्पना असून सर्व विटभट्ट्यावर राबविल्या जाव्यात असे निर्देश श्री. दांगडे यांनी दिले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले उपस्थित होते.