CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली नाभिक समाज संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न-नवचैतन्याला पालवी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : येथील नाभिक समाज संघटना, डोंबिवली, रजि. नं . ई - ४४२ च्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. सदर उद्घाटन प्रसंगी श्री गणेश पूजन आणि महिलांसाठी हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डोंबिवली शहरातील तब्बल ४५० ते ५०० समाज बंधू आणि भगिनींनी उपस्थिती लाभली.कार्यालयाचे उद्घाटन नाभिक समाजातील ज्येष्ठ नागरिक वासुदेव पवार, रामकृष्ण पोफळे,शिवदास वखरे, रघुनाथ काशीद, रामचंद्र माने आणि महादेव भंडारे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाला नाभिक समाज संघटना कल्याण, नाभिक समाज संघटना अंबरनाथ यांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

उपस्थित नाभिक बांधवांकडून डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे स्वतःचे कार्यालय सुरू झाले याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. अनेकांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये गेले २० ते २५ वर्ष आम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतो, ती आज प्रत्यक्षात साकार झाली हे पाहून आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली.

नाभिक समाज संघटनेची स्थापना १९७२ मध्ये झाली परंतु सदर संघटनेचे स्वतःचे कार्यालय कार्यान्वित होणे अपूर्णच राहिले होते. हे स्वप्न नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पूर्ण केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री बाबासाहेब राऊत ,मंगेश पोफळे ,बाळा पवार रमेश वखरे, तुषार शिंदे, अशोक अतकरे ,सोमीनाथ वरपे, संतोष आवटे, दशरथ चित्ते, कृष्णा कदम, कृष्णा करूडकर आणि सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. नाभिक समाजाला हक्काचे कार्यालय मिळाल्यामुळे नाभिक समाजात उत्साहाचे वातावरण या निमित्ताने निर्माण झाले आहे.आता समाजकार्यासाठी आम्हाला सुद्धा वेळ देता येईल अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष अरुण दादा जाधव हे आवर्जून कार्यक्रमाकरिता उपस्थित होते,तर सदर कार्यक्रमाकरिता महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महिलांना हळदीकुंकू ,तिळगुळ आणि नाभिक समाजाच्या वतीने वाण म्हणून छान भेटवस्तू देण्यात आली.

या वेळी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोशिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नाभिक समाज संघटनेचे सल्लागार व क्राईम बॉर्डरचे संपादक राजेंद्र वखरे तसेच आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा तथा श्री स्वामी सखा (मासिकाच्या) संपादीका सौ.सीमा वखरे हे उपस्थित होते .