CRIME BORDER | 26 December 2025 | 02:59 PM
सौ. नयना चौधरी
भुसावळ (वरणगाव) : भुसावळ येथील श्रीमती प. क .कोटेच्या महिला महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ युवती सभेतर्फे कॉन्सलिंग फॉर बॉईज अँड गर्ल्स या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर .आर .पी. फालक यांच्या हस्ते झाले त्यावेळी श्री विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य शिरीष कुमार नाहाटा , योग शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र पाटील उपस्थित होते तसेच प्रभारी प्राचार्य डॉक्टर जीवन धांडे यांनी निसर्गाशी आपले असलेले नाते याचे महत्त्व सांगत निसर्ग हीच खरी संपत्ती आहे.
हिरवळ, शुद्ध हवा आणि शांततेतून मानसिक समाधान मिळते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती सोबत नाते जपणे हे देखील आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले पुढे ते म्हणाले समुपदेशन जीवनात पुनर्मुल्यांकन करण्याची किंवा नवीन ध्येय निश्चित करण्याची संधी देते डॉक्टर पालक म्हणाले समुपदेशनामुळे परिस्थिती आणि अनुभवांबद्दल नवीन दृष्टिकोन मिळवण्याची संधी मिळू शकते ए आयच्या जगात सामाजिक बांधिलकी जपावी लागेल .तर डॉ.लीना चौधरी यांनी योगा विषयी महत्व सांगितले .डॉ.विना महाजन यांनी लग्नाआधी व लग्नानंतर होणारे मानसशास्त्रीय बदल या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली करिअर कौन्सिलिंग या विषयावर प्रा. मुकेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा समारोप आयक्यू एस चे समन्वयक डॉ. जे. व्ही .धनवीज यांच्या उपस्थितीत झाला या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दीपेश कोटेचा, सचिव राजेश सुराणा यांचे सहकार्य लाभले दिपाली पाटील मॅम यांनी प्रास्ताविक केले.