CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
DOMBIVLI : डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा येथील वै.ह.भ.प .गजानन महाराज हेंद्रया म्हात्रे यांचे दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रथम पुण्यस्मरण आहे.त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत श्राद्ध विधी होईल तर सकाळी ९ ते १० च्या दरम्यान प्रवचन सेवा सदगुरुवर्य ह.भ.प. शरद महाराज म्हात्रे दातिवली ,यांचे प्रवचन होणार आहे.
तर सकाळी १० ते १२ या दरम्यान गुरुवर्य ह.भ.प .सौ.लक्ष्मीताई महाराज चिंचोळे, पिंपळगाव सुतार (जालना) यांचे कीर्तन होणार आहे.या कीर्तनास साथ: समस्त साधक बंधू-भगिनी परिवार आणि वारकरी आनंद संप्रदाय देणार असून त्याच बरोबर मृदंगमणी ह.भ.प.श्री.जितेंद्र खोत ,सागर घोटेकर, अक्षय पवार हे देणार आहेत.
सदर कार्यक्रम हा ओम शिव श्रद्धा बंगला हेंद्रया कॉम्प्लेक्स चिचोंड्याचा पाडा ,सुभाष रोड,डोंबिवली पश्चिम या ठिकाणी होणार आहे.वै.ह.भ.प .गजानन महाराज हेंद्रया म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे वडील व नगरसेविका सौ.कविता म्हात्रे यांचे सासरे आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले (नगरसेवक विकास म्हात्रे व विलास म्हात्रे ) ,सुना ,मुली ,जावाई, नातू नातवंडे असा भला मोठा परिवार आहे.वै.ह.भ.प. गजानन महाराज हेंद्रया म्हात्रे हे एक मनमिळाऊ स्वभावाचे तसेच इतरांना चांगला मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्व होते.