CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : फिर्यादी नामे सुरेश ब्रिजमोहन शर्मा राहणार कोपर रोड डोंबिवली पश्चिम याचे मालकीची हुंडाई कंपनीची कार क्रमांक MH 47 N 4450 ही आरोपी नामे टोनी पीटर चतीयर वय-35 वर्षे याने भाड्याने घेऊन गेला असता फिर्यादी यांची कार फिर्यादी यांना परत न करता फिर्यादी यांची फसवणूक करून त्यांच्या कारचा अपहार केला बाबत विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 73/2022 भा. द. वि. कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी गुन्हा रजिस्टर नंबर 671/3021 भा द वि कलम 420,406 प्रमाणे दाखल असून अद्याप पावेतो फरार होता सदर आरोपी हा वेळोवेळी आपले राहते पत्त्याचा ठावठिकाणा बदलत होता अटक आरोपी यास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पलावा डोंबिवली पूर्व या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.अटक आरोपी याने पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यात अपहार केलेली कार ही चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी दिलेली असल्याचे सांगितले त्या अनुषंगाने विष्णुनगर पोलिस स्टेशनचे पो उपनिरी/कुलदीप मोरे,पोलीस हवालदार/शकील जमादार तसेच पोलीस हवालदार/नाईकरे,पोलीस शिपाई कुंदन भामरे यानी चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील अपहार केलेली कार जप्त करून विष्णुनगर पोलीस स्टेशन तसेच कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथील गुन्हे उघडकीस आणले आहेत