CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे एप्रिल मध्ये दिसून आले.कोरोना रूग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असलातरी म्रूत्यूचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार कडोंमपाने लागू केलेले लाँकडाऊनमध्ये निर्बधांचे उल्लंघन होताना डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. दुकाने, भाजीपाला ,मटण-मच्छी आदिना ठराविक वेळेचा कालवधी ठरवून दिला असताना त्यानंतर ही काही ठिकाणी त्यांचे व्यावाहर बिनधास्त पणे सुरु राहत आसून यात नागरिकही बेफिकिरीने वागत असल्याने कोरोनाचे संक्रमण तरी कसे रोघायचे हा प्रश्न सरकारी यंत्रणांना पडला आहे.
वाँक करणा-यांचा बेजबाबदार पणा अनेक जण बेजबाबदार पणे नागरिक सकाळ सायंकाळी वाँक च्या नावाखाली सर्रास फिरताना दिसतात. काही तर मुखपट्टी चा वापरही करत नाहीत. असे चित्र नांदिवली टेडकडी,खाडीकिनारी, भागशाळा मैदान,उबार्ली। टेकडी, ठाकुर्ली ९०फिट रस्ता आदि परिसरात वावरताना दिसतात. डोंबिवली ही कोरोनाचा हाँटस्पाँट झाली आहे. त्यामुळे येथेही कारवाई होऊन संक्रमण रोखणे गरजेचं आहे असे नागरिक म्हणू लागले आहेत.