CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पत्रकारांनी बातमी करताना वास्तविकतेचे भान राखले पाहिजे - डीसीपी . विवेक पानसरे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : आज काल ज्याच्या मनात येईल तो उठतो आणि स्वतःचे मध्यम सरू कारेतो. स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा त्याला चालविणाऱ्याप्रमाणे बातमीमध्ये रंग भरतो असे न करता वास्तविकतेचे भान ठेवून पत्रकारांनी वस्तुस्थिती समाजासमोर आणण्याची गरज आहे. कारण वेगवान तंत्रज्ञानामुळे आता घडलेली घटना ताबडतोब समाजमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहचते असे प्रतिपादन कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी डोंबिवली पत्रकारकक्षात केले.

पत्रकार दिनाच्या कार्याकरत पानसरे प्रमुख वक्ता म्हणून ‘पोलीस व पत्रकार’ याविषयावर संवाद साधत होते. यावेळी डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, महापालिका फ प्रगागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, ग प्रगागक्षेत्र अधिकारी स्नेहल करपे, माजी परिवहन सभापती संजय पावशे, जेष्ठ पत्रकार बापू वैद्य उपस्थित होते.

मागर्दर्शन करतांना पानसरे पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळात बातमीच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि टी बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पोहचायची. त्या काळी कालची बातमी आज कळायची, दूरदर्शन आल्यानंतर सकाळची बातमी संध्याकाळी कळायची, वेब पोर्टल आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आली त्यामुळे तात्काळ बातमी कळू लागली. पत्रकारांमुळे पोलिसांना अनेक घडामोडी कळतात त्यामुळे तपास कार्यात मदत होऊन गुन्ह्यांची उकल लवकर होते. त्यादुर्ष्टीने पत्रकार एक प्रकारे खरे पोलीस मित्र आहेत. यापुढेही त्यांच्याकडून पोलिसांना सहकार्याची अपेक्षा आहे. समाजात पत्रकाराची भूमिका ही महत्वाची मानली जाते. माध्यमांमध्ये राजकारणण्याचा शिरकाव झाल्यामुळे वस्तूस्थितीचा विपर्यास होऊ लागला. वास्तवात नसलेल्या बातम्यासुद्धा समाज मनावर बिन्बाविल्या जातात यावर आक्षेप घेत पानसरे म्हणाले कि, ज्याप्रमाणे पूर्वी समाज सुधारकांनी प्रबोधनाचे काम केले व समाज घडविला त्याप्रमाणे सध्या पत्रकारांनी भूमिका बजाविण्याची गरज आहे.

सदर कार्यक्रमात क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे, प्रशांत जोशी, किशोर पगारे, शर्मिला वाळूंज, भाग्यश्री प्रधान, श्रुतिका शेलार, शंकर जाधव, नरेंद थोरवडे, शरद शहाणे, मिथिलेश गुप्ता, बजरंग वाळूंज, संजीत वायंगणकर, वासुदेव मेनन, प्रथमेश वाघमोरे, प्रवीण गोरे आणि प्रदिप भणगे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री प्रधान यांनी केले तर आभार प्रदर्शन बजरंग वाळूंज यांनी केले.