CRIME BORDER | 26 December 2025 | 03:00 PM
Dr. Shasikant Kale / Navnath gaykar
ईगतपुरी : महाराष्ट्रातील नामवंत कथालेखक, सुप्रसिद्ध व्याख्याते तथा पत्रकारीता,धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असणारे मा.श्री.नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांचेशी येत्या मंगळवारी दि.१४ ऑक्टो.रोजी नाशिककर साहित्य रसिक 'पुस्तकावर बोलु काही....' या गिरणा गौरव प्रतिष्ठानचे वतीने आयोजीत उपक्रमातंर्गत ऐसपैस गप्पा व संवाद साधणार असल्याची माहिती प्रतिष्ठाने अध्यक्ष मा.सुरेश पवार यांनी दिली आहे. गिरणा गौरव प्रतिष्ठान चे वतीने नाशिक मध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे.या माध्यमातुन मा.पवार यांनी शेकडो साहित्यिकानां हक्काचे व्यासपीठ दिले असुन, प्रोत्साहन देत त्यांना प्रकाशात आणले आहे.
गायकर हे महाराष्ट्रातील आघाडीचे कथालेखक असुन कथाकथन ही प्रभावी पद्धतीने करतात.त्यांना राज्यस्तरावर विविध सन्मान व मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ग्रामीण व विनोदी कथा लेखन शैलीत त्यांचा दांडगा हातखंडा असुन ते वाचकप्रिय लेखक आहेत.
मंगळवार दि.१४ ऑक्टो.रोजी संध्या.६ वाजता नाशिक येथील जिल्हा न्यायालयासमोरील हुतात्मा स्मारकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी गायकर हे आपल्या 'आघाडी' या कथासंग्रहातील विविध कथा,त्यातील मुल्य, मानवी भाव भावनाचां कल्लोळ, वैचारीक द्वंद आदी भावनाचां वेध घेणार आहेत.
या कार्यक्रमास नाशिक शहर व जिल्हयातील साहित्यिक रसिकानीं भरभरुन प्रतिसाद दयावा व मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांचेसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी केले आहे.