CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डाॅ विजय सुर्यवंशी यांचे संकल्पने मधून आणि आवाहना नुसार महापालिकेच्या आरक्षित जागा स्थानिक स्वयंमसेवी संस्था व स्थानिक नागरीक यांचे सहकार्याने वृक्ष दत्तक घेउन खुल्या जागेवर वृक्षारोपन करणे , आणि महापालिकेच्या मार्गदर्शना खाली जागेचे संरक्षण करण्याकरीता आवाहन केले होते त्या अनुशगांने कल्याण पूर्व विजयनगर-आमराई येथील नियोजीत धर्मवीर आनंद दिघे उद्यान येथे,नगरसेविका माधुरी प्रशांत काळे, यांनी विदर्भ युवक मंडळ कल्याण पूर्व व विजयनगर हाउसिंग फाउंडेशन मर्यादित , यांच्या विद्यमाने कल्याण पूर्व मध्ये रक्षाबंधन दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, वृक्षांची रक्षा करणे हे आजच्या निसर्गाच्या नियमांची गरज आहे,
वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी जीवित हानी पासून सृष्टीची हानी देखील सुरू आहे, माणसाने आपल्या सोयीनुसार अनेक बांधकाम, रस्ते ,तयार केलेत , आणि भरमसाठ वृक्षतोड केली . नैसर्गिक ऑक्सिजनची कमतरता शहरांमध्ये भासत आहे याकरिता "सृष्टी रक्षा हेच" "रक्षाबंधन व्हावं" या उद्देशाने वृक्षारोपण कल्याण पूर्व मध्ये सौ. माधुरी प्रशांत काळे यांनी, सामाजिक संस्थांना सोबत घेवून मोलाचे कार्य केले आहे .
कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त अनंत कदम ,नगरसेविका सौ माधुरी प्रशांत काळे,'ड' वॉर्ड प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल,कार्यालयीन अधिक्षक संजय कुमावत ,विदर्भ युवक मंडळ सस्थांपक पी.डी. चौधरी ,अध्यक्ष, उत्तम पाटील,सचिव,सुरेश ढगे, विजय गायगवळी, सौ सुरेखा कपले,सौ कासार ताई,सौ सुरेखा गौरे- सचालिका, सिध्दीविनायक सामाजिक संस्था. सौ आशा चौधरी.विजयनगर फेडरेशन चे पदाधिकारी अध्यक्ष,पि.डी.चौधरी , कार्यकारी सचांलक-प्रशांत काळे, सचिव-प्रदीप तांबे, कोषाध्यक्ष - वासुदेव कदम, जेष्ट सतांलक-रामदास कणसे दादा, संभाजी माने,नरेश कासार,किरण गौरे,विनय ठोकळे,यांचे सह नागरीक मोठ्या संख्येंने उपस्थित राहून हा अनोखा उपक्रम राबवला.