CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली ( क्राईम बॉर्डर ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक सप्टेंबर-आक्टोबर मध्ये होणे अपेक्षित होते,परंतु कोरोना सारख्या महामारी मुळे ११ नोव्हेंबर ला लोकप्रतिनिधी चा कार्यकाळ संपुष्टात आणून प्रशासकीय राजवट आणून विद्यमान आयुक्त यांच्या हाती प्रशासकीय कारभार सोपविण्यात आला.२७ गांवे महानगरपालिकेत ठेवावीत की वगळावित या विषयीचा आजून खेळखंडोबा संपलेला नाही.तो अजुनही या २७ गांवांचा प्रश्न न्यायालयात आडकला असून तो मार्चमध्ये निकाली लागेल असा अंदाज आहे.या प्रश्नावर संघर्ष समिती, महापालिका व महाराष्ट्र शासन यांच्या परस्परविरोधी वादात आडकला आहे.
(थोडक्यात २७ गांवाचा प्रश्न हा राजकीय खेळ ) यात सेनेला २७ गांवापैकी फक्त १८गांवे वगळून वेगळी नगरपालिका स्थापन करावी व उरवरीत ९गांवात ग्रोथ सेंटर स्थापन करून बेरोजगारी चा प्रश्न सोडविण्यात येवून या गांवांचा विकास करण्यात यावाळ. याला भाजप व भाजपप्रणीत संघर्ष समितीचा विरोध आहे. लवकरच होऊ घातलेल्या कडोंमपा निवडणूकीचे अप्रत्यक्ष बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे.कडोंमपाची होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आतापर्यंत असलेले नगरसेवक/नगरसेविका आणि इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात सकाळ-संध्याकाळ हिंडून नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली असून वेगवेगळी आमिषे मतदारांना देत आहेत.त्यामध्ये सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या विनामुल्य साफ करणे,सोसायटी मध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी असवासन देणे,पिण्याच्या पाण्याची टंचाई होते त्यावेळेस टँकरने मोफत पाणी पुरवणे,आरोग्य, साफसफाई इत्यादी कामे करण्यासाठी हिरारिने करण्यास सुरुवात केली आहे.म्हणजे असे चित्र मतदारांन पुढे उभे करायचे की आम्हाला नागरिकांची किती काळजी आहे.
तसेच या पक्षात त्यापक्षात पक्ष सोडलेल्यांनी पक्षात परत येणे ह्या मनोरंजन खेळास सुरुवात झाली आहे.आणि पेक्षा जोरदार उमेदवारी पक्ष देत नसेत तर पक्षातंर बाजी करून पक्षनिष्टांना बाजूल सारून आपली उमेवारीची पोळी भाजून घेणे. ज्यावेळी निवडणूक जाहिर होईल त्यावेळेस उमेदवारीवरून मनोरंजन मतदारांचे होईल.