CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लस सुरक्षित लाभार्थी नागरिकांनी लसीकरण करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे दि. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांना देण्यात येणारी लस ही संपूर्ण सुरक्षित असून लाभार्थी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर कोविडच्या दुसऱ्या लाटेशी लढताना लाभार्थी नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होण्यासाठी युद्धपातळीवर माहिती शिक्षण संवादाची ( IEC ) अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये विशेषतः आदिवासी पाड्यांवरील नागरिकांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत चुकीच्या गैरसमजूती असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिक फारसे उत्सुक नाहीत. ही बाब लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली असून यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. आज डॉ. रुपाली सातपुते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामीण भागातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवे, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) एच. एल. भस्मे, समाजकल्याण अधिकारी सुनिता मते आदी अधिकारी तसेच सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

हे आहेत कोविड केअर सेंटर

ग्रामीण भागात कोविड रुग्णासाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील भिणार येथे २०८ बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. तसेच शहापूरच्या गोठेघर येथे १०० बेड्चे आणि कल्याण येथील वरप येथे १०० आणि मुरबाड येथे ट्रॉमा केअर येथे ७५ बेड्चे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.