CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर चे पत्रकार अविनाश वाकचौरे कडोंमपा.च्या कोविड सेंटरला सेवारत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : क्राईम बॉर्डरचे रिपोर्टर तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अविनाश वाकचौरे हे नेहमी क्राईम बॉर्डर व सीआरडब्लुए या एनजीओच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग घेत असतात.

संघटनेच्या !! चला पेटवू या दिवे,ज्या ठिकाणी अजूनही अंधार आहे !!. ह्या ब्रीद वाक्यानुसार त्यांनी पहिली कोरोना वेक्सिंन घेतल्यानंतर आपला समाजाला कुठेतरी फायदा व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सेंटरमध्ये कोविड योद्धा म्हणून काम करण्याची इच्छा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांच्याकडे व्यक्त केली असता त्यांच्या विचाराचे कौतुक करून तशी त्यांना परवानगी दिली.

अविनाश वाकचौरे यांनी मागच्या वर्षी सुद्धा कडक लॉक डाऊन मध्ये कोरोना योद्धा म्हणून काम करून गोरगरीब लोकांना जेवण ,बिस्किटे पाणी वाटप केले ,जे आजारी असतील त्यांना शास्त्री नगर रुग्णालयात नेऊन रुग्णालयामार्फत मोफत उपचार दिले, तसेच इतर सेवाही दिल्या त्या बद्दल क्राईम बॉर्डरचे मुख्य संपादक श्री. राजेंद्र वखरे यांनी अविनाश वाकचौरे यांना कोरोना योद्धा हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. .


त्यानुसार अविनाश वाकचौरे यांनी कडोंमपाच्या कोविड सेंटर डोंबिवली येथे कोविड योद्धा म्हणून काम सुरू केले आहे. त्यांच्या कामाचे क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन कडून कौतुक होत आहे.

.