CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
नाशिक crime border news network - मुक्त शिक्षणासाठी देशातील अगनगन्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषदेकडून 'अ' श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. देशात २०१९ पासून दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांच्या नॅक मूल्यांकनाला सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅककडून पहिल्याच फेरीत 'अ' श्रेणीसह मानांकन प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी काळ विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केली. कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्य गुंजाळ, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे संचालक डॉ. हेमंत राजगुरू उपस्थित होते. या मानांकामुळे मुक्त विद्यापीठाने आपले 'जनगणना घरोघरी' हे ब्रीद सार्थ ठरले असून, 'सर्वांसाठी शिक्षण’ या तत्वाची उत्तम अंमलबजावणी केल्यावरून राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषदेने पिद्यापीठाचे कौतुक केले आहे. आठ सदस्यांचा समावेश असलेल्या नॅक पीआर टीमने दिनांक ६ ते ८ एप्रिल दरम्यान विद्यापीठ मुख्यालयास भेट देऊन गुणवतेच्या निकषांची पाहणी केली. नॅक समितीने विद्यापीठातील भौतिक, माहिती व तंत्रन्यानाधिष्टीत पायाभूत सुविधा बी अध्ययनाचे स्रोत यासाठी चार पॉईंट स्केलवर सर्वाधिक म्हणजे ३.४५ गुण मिळाले. त्या पाठोपाठ विद्यार्थी सहाय्यता व प्रगती याकरिता ३.४ तर संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांसाठी ३.३५ गुणांक मिळाले. अ वर्ग मानांकामुळे युजीसी व केंद्र सरकारकडून तसेच रुसारख्या संस्थांकडून विद्यापीठ भरीव अनुदानास पात्र होण्यासोबतच एनआयआरएफ संस्थेकडून राष्ट्रीय मानांकनासाठी मुक्त विद्यापीठाला अर्जही करता येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.
नॅक टीमने विद्यापीठाची ऑनलाईनप्रवेश प्रणालीची तसेच विद्यापीठाच्या परीक्षेच्या उत्तर पुस्तिका स्कॅनिंग व प्रॉक्टर पद्धतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन परीक्षेबद्दल कौतुक केले. कृषी विज्ञान केंद्राच्या विविध विस्तार उपक्रमांनी नॅक टीम प्रभावित झाली. तंत्रणावर आधारित पायाभूत सुविधा व त्यांचा दर्जेदार उपयोग याबद्दलही नॅक टीमने समाधान व्यक्त केले. ग्रंथालय इमारतीच्या वैशिष्ठपूर्ण रचनेबद्दल व उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त करून संदर्भ व माहितीच्या स्तोत्राबद्दल जाणून घेतले. विद्यापीठाचा हरित परिसर, नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटना यासह विविधी उपक्रम नॅक टीमला प्रभावित करणारे ठरले.
पहिल्या टप्प्यांतर्गत नवीन निकषानुसार विद्यापीठाने स्वयंमूल्यनिर्धान संख्यात्मक अहवाल सादर केला. या विविध निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापण प्रणाली संशोधन नवनिर्मिती व विस्तार पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्तोत्र प्रशाशन नेतृत्तव व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांचा समावेश होतो. दुसऱ्या गुणात्मक टप्प्यांतर्गत विद्यार्थी समाधान सर्वेक्षण आणि माहितीची विधिग्राह्यता व पडताळणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये संख्यात्मक महतीवर आधारित ऑनलाईन प्रक्रिया तर गुणात्मक माहितीस्तगी पीआर टीमची प्रत्यक्ष भेट अश्या स्वरूपात मूल्यांकन केले गेले. या कालावधीत नॅक सदस्यांनी विद्यापीठाच्या सर्व विभागांना भेटी दिल्या. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पी जी पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्य गुंजाळ, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे संचालक डॉ. हेमंत राजगुरू यांच्यासह विविध विद्या शाखांचे संचालक प्राध्यापक वित्त व लेख साधिकारी संशोधक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद कार्यप्रणाली विद्यार्थी विकास अशा अनेक बाबतीत विद्यावतहाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. माजी कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांच्या कालावधीत नॅकची तयारी करण्यात अली होती तर विद्यमान कुलगुरू डॉ. पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने नॅक समितीसमोर सादरीकरण केले.
विद्यापीठाच्या पाटचालीतील महत्वाचा टप्पा - कुलगुरू डॉ. पाटील
विद्यापिठीच्या ३२ वर्षाच्या वाटचालीतील हा एक महत्वाचा टप्पा आहे. विद्यापीठाला मिळालेल्या या श्रेणीचा फायदा हा विद्यापीठ आणि संबंधित घटकांना होईल. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक कर्मचारी आणि विविध विभागीय केंद्र व अभ्यास केंद्राचे विशेष अभिनंदन करतो.