CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

3 मे रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी, दिनांक 03 मे 2021 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे समिती सभागृह,पहिला मजला, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरुप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी परिषदेद्वारे ( Video Conferencing) अथवा अर्जदारांच्या संमतीने Google Meet, Zoom App इ. अॅपचा वापर करुन करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलाविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच अर्जदारांना छोटया संख्येच्या गटात समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करणेबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.सर्व नागरिकांनी त्यांचा तक्रार अर्ज विहित नमुन्यात तीन प्रतीत 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 16 एप्रिल 2021 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील नोंदणी शाखेमध्ये पाठविणे आवश्यक आहे.

अर्जदार यांची तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाची असणे आवश्यक आहे. लोकशाहि दिनामध्ये तक्रार करणेपूर्वी अर्जदाराने प्रथम संबंधित कार्यालयाकडे ,तसेच त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी. संबंधित कार्यालयाकडे/वरिष्ठ कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती लोकशाही दिनी सादर करावयाच्या अर्जा सोबत जोडाव्यात. तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येण्याची आवश्यकता नाही.

एका तक्रारी अर्जात एकच तक्रार असावी, एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज केला नसल्यास, सदरहु अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये स्विकारला जाणार नही. प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असल्यास अर्ज थेट स्विकारण्यात येतील.

लोकशाही दिनांत खालील बाबीशी संबंधी अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

न्याय प्रविष्ठ प्रकरणे,राजस्व/अपिल,सेवा विषयक,आस्थापनाविषयक बाबी,विहित नमुन्यात नसणारे व त्या सोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले,अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज,तक्रार/निवेदन वैयक्तिक कोणत्याही राजकीय पक्षाच्या/लोकप्रतिनिधीच्या/संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज स्विकारला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

लोकशाही दिनामध्ये अर्ज करतेवेळी अर्जदारांनी कोणत्या माध्यमातून (Video Conferencing, Google Meet, Zoom App) अथवा समक्ष लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार आहात याबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा. तसेच अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर अंतर्भूत करावा जेणेकरुन आपणांस लोकशाही दिनामध्ये माध्यमाद्वारे उपस्थित राहता येईल. असे आवाहन उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) बाळासाहेब वाकचौरे यांनी केले आहे.