CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : युवा सेनेचे सचिव वरुनजी सरदेसाई व कल्याण जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली शहरातील पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, रेल्वे आरपीएफ पोलीस दल ,लोहमार्ग पोलीस ठाणे, डोंबिवली रेल्वे स्थानक येथील मुख्य स्थानक ,प्रबंधक कार्यालय आणि सफाई कामगार तसेच व्यापारी व रिक्षाचालक ,फळ विक्रेते यांना साईनाथ लहू खनपट यांच्या वतीने मोफत मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी आतिश म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख ,नितीन पवार उपविभाग प्रमुख ,कैलास सणस ,सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक विशाल शेटे ,क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक राजेंद्र वखरे व आदी उपस्थित होते.