CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली पश्चिमेतील साई दरबार हॉल या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून क्राईम बॉर्डर तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक तसेच आश्रय महिला संस्थेचे ट्रस्टी श्री.राजेंद्र वखरे यांचा वाढदिवस संपन्न झाला.यावेळी क्राईम बॉर्डर चे प्रबंध संपादक श्री.महेश भोईर, सहसंपादक श्री.संतोष भोईर,विशेष प्रतिनिधी श्री.गणेश भोईर ,कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी, श्री.संजय ना. पाटील,सेंट झेवियर्स स्कूल -डोंबिवलीची कमिटी उपस्थित होती .या सर्वांनी शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या सत्कार प्रसंगी श्री.महेश भोईर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की क्राईम बॉर्डर हे नुसते वृत्तपत्र नसून एक समाजाचा आरसा आहे.क्राईम बॉर्डर हे सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून त्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबवल्या जातील. तर श्री.संतोष भोईर म्हणाले की क्राईम बॉर्डर हे फक्त वृत्त प्रकाशित करीत नसून जनजागृती व कुटुंब व्यवस्था तसेच राष्ट्रीय एकात्मता रुजविण्याचे महान कार्य करीत आहे.त्याचबरोबर प्रिन्सिपल श्री.गणेश भोईर म्हणाले की शाळा ही विद्यार्थी घडविते तर क्राईम बॉर्डर हे युवा पत्रकार घडविण्याचे कार्य करीत आहे.क्राईम बॉर्डर चे प्रतिनिधी श्री.संजय पाटील म्हणाले की आम्ही क्राईम बॉर्डर मध्ये असल्याचा मला अभिमान वाटतो.
याप्रसंगी सेंट झेवियर्स स्कूलच्या सेकंडरी सेक्शन च्या HM वसंता सतीश कुमार ,प्रायमरी स्कूलच्या HM सायली पळसेकर व प्री-प्रायमरी स्कूल च्या HM मेरी वारकर उपस्थित होत्या सत्कार समारंभ हा कोरोना चे नियम पाळून साजरा करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री.राजेंद्र वखरे यांनी सर्वांचे आभार मानून क्राईम बॉर्डर च्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम सतत राबवत राहू असे सांगितले.