CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी डोंबिवलीत होणार सत्कार
डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : गेल्या १९९१ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक तथा क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष श्री.राजेंद्र श्रावण वखरे (सर) यांना मानाचा समजल्या जाणारा जान्हवी मल्टी फाऊंडेशनचा सेवा संस्कार पुरस्कार २०१९-२१ जाहीर झाला असून ,तो उद्या दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता , स्थळ जान्हवी मल्टी फाऊंडेशन , डोंबिवली (वेस्ट) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जान्हवी मल्टी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे व डॉ.प्रेरणा कोल्हे हे सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.
यावर्षी पत्रकारिता व समाज सेवा या क्षेत्रातून श्री.राजेंद्र श्रावण वखरे यांची निवड करण्यात आलेली आहे ,त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विशेष कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी (जे.एम.एफ ची टीम) निवड करीत असते.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी (जे.एम.एफ.) ची टीम परिश्रम घेत आहे.