CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सैनिकाला शिकारीचे स्टेटस पडले महागात!

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

चिपळूण (डॉ.गजानन आंबेकर) : सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघड झाली आहे .सदर प्रकार हा दि.२ ते ३ एप्रिल दरम्यान घडला असून याबाबत लीलाधर वराडकर वय वर्ष २५ राहणार कुणकेरी, वाघबीळ येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.शेकरूची शिकार करून त्याने व्हाट्सअप स्टेटस वर त्याचा फोटो टाकल्यामुळे हा प्रकार समोर आला. लीलाधर वराडकर हा युवक सैन्यदलामध्ये कार्यरत आहे. कुणकेरी येथील वराडकर हा मार्च महिन्यात आपल्या गावी रजेवर आला होता .त्याने दि २ ते ३ एप्रिल २०२० दरम्यान वाघबीळ येथील जंगलांमध्ये जाऊन दोन शेकरूंची गोळ्या घालून शिकार केली होती. त्यानंतर त्याने त्या शेकरूंन सोबतचे सेल्फी काढलेले फोटो व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले .यामुळे सदर प्रकाराला वाचा फुटली हे फोटो वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य वन्यजीव संरक्षक मोहन भाटे यांच्या हाती लागल्यावर त्यांनी कॉल द्वारे तसेच लेखी पत्राद्वारे याची माहिती येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण तसेच मुख्यवनसंरक्षक नितीन काकोडकर यांना दिली असता सदर माहिती तातडीने जिल्ह्याच्या वन विभागाला देण्यात आली. उपवनसंरक्षक चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने वराडाकर याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले . ‌संशयीताला कुणकेरी येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत उपवनसंरक्षक चव्हाण म्हणाले की, कुणकेरी येथील जंगलात झालेल्या या शिकारीची माहिती यापूर्वीच आम्हाला मिळाली होती. या सर्व प्रकाराची आम्ही चौकशी करीत होतो. परंतु वडाळकर याला ताब्यात घेतलेले नव्हते, परंतु नंतर आम्ही त्यास ताब्यात घेतले आहे .त्याला येथील न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले .यावेळी त्याला चार दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे ,सहाय्यक वनसंरक्षक जळगावकर , वनपाल प्रमोद राणे ,दिलीप पेडणेकर व इतर वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

शेकरू (महाराष्ट्राचा राज्य प्राणी) - शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारूताई. हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात आढळतो. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून उपयोग करते.उंच झाडावर शेकरू घ्रर बांधते. झाडाच्या काटक्या मऊ पान यांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घर बांधतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो शेकरू एकावेळेस १ ते २ पिलांना जन्म देते. शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो . सुर्योदय झाल्या वर शेकरू घराबाहेर पडते ठरलेल्या झाडावर अन्न खाते सकाळी ११ ते ३ आराम करते. पुन्हा सूर्यास्त पर्यंत खाद्य खून अंधारापुर्वी घरट्यात परततो.असा हा सर्वात सुंदर प्राणी वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.