CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी) : ज्या समूह प्रमुखाकडे सर्व सदस्यांचे एकत्रित १)इन्फ्लुएन्झा सदृश्य लक्षणं नसल्याबाबतचा मेडिकल रिपोर्ट २)कंटेनमेंट झोन मध्ये राहत नसल्याबाबत ची संबंधित वॉर्ड ऑफिसरची एनओसी ३). व वाहनाची उपलब्धता असेल.अशा समूह प्रमुखाने या covid19.mhpolice.in या लिंक वर ठाणे सिटी हा ऑप्शन निवडून एप्लीकेशन करायचे आहे.असे एप्लीकेशन करताना आपले आधार कार्ड,मेडिकल सर्टिफिकेट,कंटेनमेंट झोन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट व वाहना बाबतची माहिती अपलोड करायची आहे.ज्यांना रेल्वे ने प्रवास करायचा आहे अशा समूह प्रमुखांनी सुद्धा एप्लीकेशन करून ठेवावे.रेल्वे ची उपलब्धता झाल्यावर त्यांना कळविण्यात येईल.सर्व डॉक्युमेंट ची साईज Kb(KiloBytes) मध्ये ठेवावी जेणेकरून लवकर अपलोड होईल.असे पोलीस उपायुक्त झोन-3 विवेक पानसरे (कल्याण-डोंबिवली)यांनी विभागातील जनतेला सूचित केले आहे .